BLB Share Price: शेअर बाजारात असंख्य स्टॉकची नोंद आहे. त्यापैकी केवळ काहीच शेअर्स असे आहेत की जे गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस पाडतात. तर काही स्टॉक मल्टीबॅगर असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा देतात. जे स्टॉक त्यांच्या किमतीच्या कित्येक पट परतावा देतात त्यांना मल्टीबॅगर्स म्हणतात. असाच एक मल्टीबॅगर स्टॉक म्हणून पुढे येणारी कंपनी म्हणजे बीएलबी लिमिटेड! या कंपनीने अवघ्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे.
बीएलबी (BLB Ltd) ही कंपनी बाबू लाल बागरी यांनी 1965 साली स्थापन केली. या कंपनीचा मुख्य व्यवसाय शेअर्स आणि सिक्युरिटीजमध्ये व्यापार आणि गुंतवणूक आहे.बीएलबी लिमिटेडच्या शेअर्सनी मागील सहा महिन्यांत जबरदस्त उंची गाठली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये 90 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, गेल्या एका महिन्यात शेअरच्या किमतीत 71 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याशिवाय, गेल्या 5 दिवसांत शेअरच्या किमतीत 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
अशी झाली शेअरच्या किंमतीत वाढ (This is how the share price increased)-
5 जुलै 2022 रोजी एनएसईवर (NSE: National Stock Exchange) स्टॉक किंमत 17.90 होती. यानंतर, स्टॉकमध्ये थोडीशी घसरण झाली आणि स्टॉकने 27 जुलै 2022 रोजी 15 वर क्लोजिंग केले. मात्र, यानंतर शेअरमध्ये तेजी आली असून आता शेअरने 34 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. स्टॉकने 4 जानेवारी 2023 रोजी.34.30 च्या किमतीवर क्लोजिंग दिले आहे. यासह, गेल्या 6 महिन्यांत शेअरच्या किंमतीत 91.62 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
5 डिसेंबर 2022 रोजी शेअर बाजार बंद झाल्यावर, शेअरची किंमत 20.05 रुपये होती. अशा स्थितीत एका महिन्यात शेअरची किंमत 71.07 टक्क्यांनी वाढली आहे. तर, 29 डिसेंबर 2022 रोजी स्टॉकची बंद किंमत 24.55 रुपये होती. अशा स्थितीत गेल्या पाच दिवसांत स्टॉकमध्ये 30.67 टक्क्यांनी वाढ झाली आहे.