Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multibagger Stock: या सरकारी कंपनीने गुंतवणुकदारांना मिळवून दिला साडेचार लाख टक्क्यांनी फायदा!

Bharat Electronics shares

Image Source : Bharat Electronics shares

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअरनी गुंतवणुकदारांची चांगली कमाई करून दिली. या कंपनीचे दीर्घकालीन शेअर घेतलेल्या व्यक्तींना मोठा फायदा झाला आहे. या कंपनीचे येत्या काळात आणखी शेअर वाढणार आहेत, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. याबाबतचे तपशील पुढे वाचा.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (Bharat Electronics ) शेअर्समध्ये दीर्घकालीन पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचे चांगला परतावा मिळाला आहे. या सरकारी कंपनीच्या स्टॉकने 45 हजार 627 टक्के परतावा दिला आहे. या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवणारा गुंतवणूकदार आज करोडो रुपयांचा मालक आहे.

एनएसईवर मंगळवारी कंपनीचे शेअर्स 0.35 टक्क्यांनी वाढून 100.70 रुपयांवर व्यवहार करत होते. या सरकारी कंपनीने आतापर्यंत 3 वेळा बोनस शेअर्सही जारी केले आहेत. गेल्या 6 महिन्यांत बीईएलच्या स्टॉकमध्ये सुमारे 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, हा स्टॉक एका वर्षात सुमारे 43 टक्के वाढला आहे.

1 लाखातून 45 कोटी कमावले (Earned 45 crores from 1 lakh)-

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1999 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला 4 लाख 54 हजार 545 शेअर मिळाले आहेत. जर गुंतवणूकदाराने हे शेअर्स आत्तापर्यंत ठेवले असतील तर आज या शेअर्सची संख्या 44 लाख 99 हजार 994 झाली आहे. कारण 23 वर्षांच्या कालावधीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 3 वेळा बोनस शेअर जारी केले आहेत. 14 सप्टेंबर 2015 रोजी प्रथमच बोनस शेअर्स जारी करण्यात आले. त्यानंतर कंपनीने हे बोनस शेअर्स 2:1 च्या प्रमाणात जारी केले होते. 28 सप्टेंबर 2017 रोजी या सरकारी कंपनीने पुन्हा 1:10 च्या प्रमाणात बोनस शेअर जारी केले. तिसऱ्या आणि शेवटच्या वेळी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले. जर आपण आजच्या किंमतीनुसार 100.70 रुपये प्रति शेअर मोजले, तर गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये आज 45 कोटी रुपये झाले आहेत.

आणखी वाढ होण्याची शक्यता (The share price may rise further)-

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही नवरत्न पीएसयुची कंपनी आहे. त्यांचा बाजारातील हिस्सा 50 टक्के पेक्षा जास्त आहे. हे देशाच्या संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स गरजा पूर्ण करण्यास मदत करते. हे लष्कर, हवाई दल आणि नौदलासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा एक प्रमुख पुरवठादार आहे. संरक्षण क्षेत्रातील आयात कमी करण्यावर सरकारचा भर आहे. त्यामुळे आगामी काळात बीईएलचा व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे, असे गुंतवणूक सल्लागार विवेक नाडकर्णी यांनी सांगितले.