सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने आपल्या 35 व्या स्थापना दिनानिमित्ताने नवीन लोगोचं अनावरण केलं आहे. बुधवारी स्थापना दिनानिमित्ताने सेबीच्या मुख्य कार्यालयामध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये आजी-माजी सदस्यांच्या उपस्थितीत या लोगोचं अनावरण करण्यात आलं. या नवीन लोगोचं सगळ्यांनीच मोठ्या उत्साहाने स्वागत केलं आहे.
लोगोची वैशिष्ट्यं
सेबीचा नवीन लोगो हा मॉडर्न पद्धतीने आडव्या रचनेत डिझाईन केला आहे. जुन्या आणि नवीन लोगोमध्ये सामायिक आहे ते म्हणजे लोगोचा रंग. सेबीने आपल्या नवीन लोगोचा रंग सुद्धा निळा रंगच ठेवला आहे. निळा रंग हा शांततेचं, ध्येयाचं आणि जबाबदारीचं प्रतीक आहे. तेव्हा या रंगातूनच सेबीवर असलेल्या जबाबदारीचं प्रतिबिंब दिसून येतं. देशाच्या उन्नतीसाठी भांडवली बाजारामधून हातभार लावण्यासाठी सेबी कटिबद्ध आहे हा संदेश सेबी आपल्या नवीन लोगोच्या माध्यमातून देत आहे. यासोबतच दररोज अर्थ जगतात घडणाऱ्या बदलांना सुयोग्य असे धोरणनिर्मिती करताना सल्लागाराची भूमिका बजावण्याची परंपरा सेबी कायम ठेवेल असा विश्वासही सेबी आपल्या या नवीन लोगोच्या माध्यमातून देत आहे.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
सेबीच्या या नवीन लोगोसंदर्भात अनेक जणांनी सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे. काही यूजर्सनी या नवीन लोगोचं स्वागत केलंय, तर काहीनी मीम्सच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे.
नूपूर जेनकुनिया या यूजरनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सेबीने आपला लोगो बदलला आहे आणि तो खूप कूल आहे.
SEBI changes its logo and it looks so cool ?
— Nupur Jainkunia (@Nupurkunia) April 12, 2023
Pics
1: New
2: Old @AnilSinghvi_ @ZeeBusiness @SEBI_India pic.twitter.com/sDc6vmhjHN
देशपांडे या यूजरने सेबीला उद्देशून प्रश्न विचारला आहे की, बोगस कंपन्यांच्या माध्यमातून शएअर मार्केटमध्ये काळा पैसा गुंतवला जातो का? यावर सेबी उत्तर देत आहे की, आमचा नवीन लोगो पाहा. अशा पद्धतीने खिल्ली उडवली आहे.
Indians: Hey SEBI, we need to know if illicit money is propping up stock market through dubious shell cos.
— Deshpande (@Deshpande__) April 12, 2023
SEBI: Check my new logo ?♂️? https://t.co/Rq9XhK9eP4