देशातील सर्वात मोठ्या सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) नोकरीची संधी आणली आहे. जर तुम्हीही बँकेतील नोकरीच्या शोधात असाल, तर स्टेट बँकेच्या पदांसाठी अर्ज करू शकता. एसबीआयने 3 वेगवेगळ्या नोटीफिकेशन्सच्या माध्यमातून नोकऱ्यांबाबत माहिती जारी केली आहे. यामध्ये विशेष अधिकारी स्तरावरील पदांची भरती केली जाणार आहे.
बँकेकडून मॅनेजर, फॅकल्टी आणि सीनियर एक्झीक्युटिव्ह पदांसाठी नोकर भरतीचे सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. याकरिता इच्छुक अर्जदार ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकता. विशेष म्हणजे बँकेकडून उमेदवाराला वार्षिक 40 लाखांपर्यंतचे पॅकेज देण्यात येणार आहे. यासाठी पात्रतेचे निकष काय असतील? अर्ज कुठे करायचा या संदर्भातील गोष्टी जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
इथे करा अर्ज
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मॅनेजर, फॅकल्टी आणि सीनियर एक्झीक्युटिव्ह पदांच्या भरतीसाठी 23 फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकारायला सुरुवात केली आहे. 15 मार्चपर्यंत इच्छुक उमेदवार हे अर्ज दाखल करू शकतात. त्यासाठी उमेदवाराला एसबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच sbi.co.in वर जाऊन उपलब्ध असलेल्या लिंकवरुन फॉर्म भरावा लागणार आहे.
पात्रतेचे निकष काय?
मॅनेजर: या पदासाठी मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशनसहीत डिप्लोमा (MBA) झालेला उमेदवार अर्ज करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे रिटेल क्षेत्रात किमान 5 वर्षाचा अनुभव आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट क्षेत्रात किमान 2 वर्षाचा अनुभव उमेदवाराला असणे गरजेचे आहे.
फॅकल्टी एक्झीक्युटिव्ह: या पदासाठी कोणत्याही विषयात पदवी घेतलेला उमेदवार पात्र असेल, मात्र या विषयात किमान 55 टक्के मार्क उमेदवाराला असावेत अशी बँकेची अपेक्षा आहे. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात अध्यापनाचा किमान 3 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे.
सीनियर एक्झीक्युटिव्ह: स्टॅटिसटिक्स, मॅथ्स, इकॉनॉमिक्समध्ये किमान 60 टक्क्यांपर्यंत गुण असलेला आणि पदव्युत्तर शिक्षण झालेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. डेटा अनॅलिसीसी, डेटा सायन्स यासारख्या क्षेत्रात किमान 5 वर्ष कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा काय असेल?
- मॅनेजर पदासाठी बँकेने 28 ते 38 वर्ष वयोमर्यादा निश्चित केली आहे
- फॅकल्टी या पदासाठी 28 ते 55 वर्ष वयोमर्यादा निश्चित केली आहे
- सीनियर एक्झीक्युटीव्ह या पदासाठी 25 ते 35 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे
पगार किती असेल?
फॅकल्टी या पदावरील कर्मचाऱ्याला त्याच्या पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार वार्षिक पगार 25 ते 40 लाख रुपयांपर्यंत देण्यात येईल. तर सीनियर एक्झीक्युटीव्ह या पदावरील व्यक्तीला त्याच्या पात्रतेनुसार 15 लाख ते 20 लाखांपर्यंतचे वार्षिक वेतन दिले जाईल. मॅनेजर या पदावरील व्यक्तीचा पगार सांगण्यात आलेला नाही.
उमेदवारांची निवड करण्यासाठी अर्जांच्या आधारावर छानणी प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर बँक मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड करेल. मॅनेजर या पदाचे बँकेने जाहीर केलेले नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच फॅकल्टी या पदाचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा. सीनियर एक्झीक्युटीव्ह या पदाचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा. यासंदर्भातील सर्व माहिती बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. काही शंका असल्यास crpd@sbi.co.in या अधिकृत ईमेल आयडीवर आपले प्रश्न पाठवून शंकांचे निरसन करून घेऊ शकता.