स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने केवायसीच्या (Know Your Customer-KYC) नियमांचे पालन न करणाऱ्या बॅंक खातेदारांची खाती गोठवली (SBI Bank Account Block) आहेत. एसबीआय बॅंकेने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे 1 जुलैपर्यंत केवायसी डिटेल अपडेट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ज्या ग्राहकांनी केवायसी डिटेल अपडेट केले नाहीत. त्यांची खाती ब्लॉक (SBI Bank Accounts Frozen) करण्यात आली आहेत; त्यामुळे त्यांना त्या खात्यातून कोणताही व्यवहार करता येत नाही.
ज्या खातेदारांची बॅकेने खाती ब्लॉक केली आहेत. त्यातील काही खातेधारकांनी सोशल मिडियावर याबाबतच्या तक्रारी बॅंकेकडे केल्या आहेत. या तक्रारींमध्ये काही ग्राहकांनी असे म्हटले आहे की, बॅंकेने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक आमची बॅंक अकाऊंट्स ब्लॉक (SBI Bank Accounts Block) करण्यात आली. यावर बॅंकेने वेळोवेळी विविध प्लॅटफॉर्ममार्फत ग्राहकांना केवायसी अपडेट करण्याच्या सूचना केल्याचे म्हटले आहे.
एसबीआय बॅंकेशी संबंधित केवायसी (KYC) पूर्ण करण्यासाठी संबंधित बॅंक खातेधारकाला खालीलपैकी कोणतीही कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे.
• पासपोर्ट
• मतदार ओळखपत्र
• वाहन चालविण्याचा परवाना
• आधार पत्र/कार्ड
• नरेगा कार्ड
• पॅन कार्ड
या कागदपत्रांच्या साहाय्याने बॅंकेची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली की, संबंधितांचे बॅंक खाते पुन्हा पूर्ववत सुरू होईल. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा केवायसी करताना काही अडचण येत असल्यास एसबीआय कस्टमर केअरशी (SBI Customer Care) संपर्क साधा किंवा जवळच्या एसबीआयच्या शाखेला भेट द्या.
image source - https://bit.ly/3AwLkBv