Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI म्युच्युअल फंडची ॲग्रो कंपनीत गुंतवणूक; हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ!

SBI MF buy Hatsun Agro Shares

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) म्युच्युअल फंड शाखेने 6 सप्टेंबर 2022 रोजी हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे (Hatsun Agro Product Ltd) 15,20,000 शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले. त्यानंतर गेल्या चार दिवसांत हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली.

एसबीआय म्युच्युअल फंडने (SBI Mutual Fund) हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे (Hatsun Agro Product Ltd) शेअर्स खरेदी केले.  बीएसई आणि एनएसईवर (BSE & NSE) उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) म्युच्युअल फंड शाखेने 6 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे 15,20,000 शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले. एसबीआय म्युच्युअल फंड हाऊसने हे शेअर्स प्रत्येकी 987.80 रुपये देऊन खरेदी केले. म्हणजेच एसबीआय म्युच्युअल फंडने हॅट्सन ॲग्रो कंपनीत सुमारे 150 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तर सुंदरम म्युच्युअल फंड हाऊसने हॅट्सनचे 12 लाख शेअर्स खरेदी करत सुमारे 118 कोटींची गुंतवणूक केली.

हॅट्सून ॲग्रो कंपनीचा शेअर्स तेजीत

hatsun agro share price
Source : https://in.tradingview.com/chart/

एसबीआय म्युच्युअल फंडकडून (SBI Mutual Fund Share Value) हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेडमधील हिस्सा खरेदी करण्याच्या बातमीनंतर हॅट्सनच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. 19 ऑगस्ट, 2022 रोजी हॅट्सन ॲग्रोचा शेअर 1138 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर मात्र त्याच्यात घसरण सुरू झाली. ही घसरण 5 सप्टेंबरपर्यंत दिसून आली. 5 तारखेला हॅट्सन ॲग्रोच्या शेअरची नीचांकी किंमत 977 होती. पण 6 सप्टेंबर रोजी एसबीआय म्युच्युअल फंडने हॅट्सनच्या शेअर्सची खरेदी केल्यानंतर हॅट्सनच्या शेअर्सची किंमत (Hatsun Agro Share Price) वाढली. आज (दि. 9 सप्टेंबर) हॅट्सनच्या शेअर्सची किंमत 1121 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या चार दिवसांत या शेअरमध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली.

एसबीआयचा हॅट्सन ॲग्रोमध्ये दुसऱ्यांदा गुंतवणूक! 

एसबीआय म्युच्युअल फंड हाऊसने खरेदी केलेल्या 15.2 लाख शेअर्समुळे, एसबीआय म्युच्युअल फंडची हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीच्या विकत घेतलेल्या शेअर्सची संख्या 1,21,11,562 शेअर्सवर गेली. जी कंपनीच्या एकूण भांडवलाच्या 5.62 टक्के आहे. यापूर्वीही एसबीआय म्युच्युअल फंडने खुल्या बाजारातून कंपनीचे 1,05,91,562 शेअर्सची खरेदी केली होती.

सुंदरम म्युच्युअल फंडची 118 कोटींची गुंतवणूक

SBI म्युच्युअल फंड व्यतिरिक्त, सुंदरम म्युच्युअल फंड हाऊसने (Sundaram Mutual Fund) हॅट्सन ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड कंपनीचे 12 लाख शेअर्स खरेदी केले. सुंदरम म्युच्युअल फंडने प्रति शेअर 987.80 रुपयांना खरेदी केले. याचा अर्थ, सुंदरम म्युच्युअल फंड हाऊसने हॅट्सन ॲग्रो कंपनीत सुमारे 118 कोटींची गुंतवणूक केली.