Sania Mirza: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा मध्यंतरी पती शोएब मलिकसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या बातमीमुळे चर्चेत आली होती. आता ती पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे देशाची ही स्टार खेळाडू आता टेनिसला अलविदा करणार आहे. नुकतीच तिने निवडृत्तीची घोषणा केली आहे. पाहूयात तिच्या या खेळाच्या कारकीर्दीविषयी व कमाईबाबत...
कधी घेणार निवृत्ती (When will you Retire)
फेब्रुवारीमध्ये दुबई येथे आयोजित केलेल्या ‘WTA 1000’ स्पर्धेनंतर ती निवृत्ती घेणार आहे. हा तिचा अंतिम सामना असणार आहे. ही टेनिस चॅम्पियनशिप 19 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सानिया मिर्झा शेवटचा सामना खेळताना तिच्या चाहत्यांना दिसणार आहे.
हैद्राबाद व दुबईला चालवणार अकादमी (Academy About)
सानिया मिर्झाजवळ टेनिस खेळाचा तगडा अनुभव आहे. आपला हा खेळ तरूणांनादेखील नक्कीच प्रेरणादायक ठरेल या हेतूने निवृत्तीनंतर तिने अकादमी सुरू करण्याचा विचार केला आहे. ही अकादमी सुरू करण्यासाठी तिने हैद्राबाद व दुबई या जागेची निवड केली आहे. हैद्राबाद येथे ती स्थायिक आहे, तर दुबई या देशात ती मागील दहा वर्षापासून वास्तव्य करत असल्यामुळे येथे अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सानिया मिर्झाची कमाई (Sania Mirza Earnings)
रिपोर्टनुसार, 2022 पर्यंत सानिया मिर्झाची एकूण संपत्ती $25 दशलक्ष (सुमारे 200 कोटी रुपये) इतकी होती. यामध्ये बक्षिस स्वरूपात मिळणारी रक्कम आणि जाहिरातींमधून मिळणारे पैसे यांचादेखील समावेश आहे. सानिया मिर्झाने WTA टूरमधून $6,963,060 इतकी बक्षिसाची रक्कम प्राप्त केली होती. टेनिस्टार तेलंगणा राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर बनण्याचा मानदेखील तिच्याजवळ आहे. खेळातून सानियाचे अंदाजे वार्षिक उत्पन्न सुमारे 3 कोटी रुपये आहे. तसेच ती सुप्रसिद्ध ब्रँड्सच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 25 कोटी रुपये कमवते. सानियाचे दुबईसोबतच हैदराबादमध्येदेखील आलिशान घर आहे. हैदराबादमधील तिच्या घराची किंमत सुमारे 13 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे एकापेक्षा एक लक्झरी कार्सखील आहेत.