Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sania Mirza's last Grand Slam : फायनलमध्ये उपविजेते ठरूनही सानिया-रोहनने किती पैसे कमावले?

Sania Mirza's last Grand Slam

Image Source : economictimes.indiatimes.com

भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने (India's star Tennis player Sania Mirza) ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत उपविजेतेपदावर राहून देशबांधव रोहन बोपण्णासह तिची ग्रँडस्लॅम कारकीर्द संपवली. पण तुम्हाला माहिती आहे का? की सानियाच्या शेवटच्या स्पर्धेत उपविजेते ठरुनही सानिया-रोहन या जोडीला किती रुपयांचे बक्षीस मिळाले? ते जाणून घेऊया.

भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने (India's star Tennis player Sania Mirza) ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत उपविजेतेपदावर राहून देशबांधव रोहन बोपण्णासह तिची ग्रँडस्लॅम कारकीर्द संपवली. ऑस्ट्रेलियन ओपनच्या शेवटच्या सामन्यानंतर सानिया मिर्झा भावूक झाल्याचे पहायला मिळाले. ही तिची शेवटची ग्रँडस्लॅम मॅच होती. पण तुम्हाला माहिती आहे का? की सानियाच्या शेवटच्या स्पर्धेत उपविजेते ठरुनही सानिया-रोहन या जोडीला किती रुपयांचे बक्षीस मिळाले? ते जाणून घेऊया. 

sania-rohan-1.jpg

ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत सानिया आणि बोपण्णा या जोडीला रॉड लेव्हर एरिना येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात लुईसा स्टेफनी आणि राफेल माटोस या ब्राझीलच्या जोडीकडून 6-7, 2-6 असा पराभव पत्करावा लागला. भारतीयांसह सानियासाठी ही स्पर्धा खास होती कारण सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची ग्रँडस्लॅम होती. Image Source   economictimes.indiatimes.com

sania-rohan-2.jpg

सानियाने तिच्या कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत, ज्यात महिला दुहेरीतील तीन आणि मिश्र दुहेरीतील तीन यांचा समावेश आहे. सानियाने महेश भूपतीसोबत 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2012 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. Image Source - www.olympics.com

sania-rohan-3.jpg

सानिया आणि रोहन बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. Image Source - www.news18.com

sania-rohan4.jpg
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरूनही सानिया आणि रोहनवर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. Image Source - www.olympics.com

sania-rohan-5.jpg

ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या उपविजेत्याला बक्षीस म्हणून 89,450 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 51 लाख 86 हजार रुपये मिळाले. तर मिश्र दुहेरीच्या विजेत्याला 91 लाख 46 हजार रुपये मिळाले. Image Source - www.nationalheraldindia.com