Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Samsung S23 Series Launch: सॅमसंगची नवीन S23 मालिका लाँच; किंमत 74,900 रुपयांपासून सुरू

Samsung S23 launching in india

Image Source : www.samsung.com

सॅमसंगने भारतात गॅलेक्सीसाठी स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिटसेट असलेली Galaxy S23 मालिका अधिकृतपणे लॉन्च केली आहे. Galaxy S23 मालिकेतील मॉडेल्स Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra 1 फेब्रुवारीपासून भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असतील.

ग्राहक 1,999 रुपयांमध्ये samsung.com वर Galaxy S23 या फोनचे बुकिंग  करू शकतात आणि 5,000 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकतात आणि जुन्या फोनवर सर्वोत्तम एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध असेल. सॅमसंग शॉप अॅपद्वारे खरेदी केल्यावर वापरकर्ते अतिरिक्त 2,000 रु.चे वेलकम व्हाउचर देखील मिळवू  शकतात. सॅमसंग वेबसाइटवर फोनची प्री-ऑर्डर करणार्‍यांना विशेष रंग पर्यायांमध्ये फोन खरेदी करण्याचा पर्याय देखील मिळेल.

Samsung Galaxy S23 Ultra भारतातील किंमत (Samsung Galaxy S23 Ultra Price in India)

Samsung Galaxy S23 Ultra फँटम ब्लॅक, क्रीम आणि हिरव्या रंगात उपलब्ध असेल . त्याचप्रमाणे, हा फोन फक्त Samsung.com वर लाल, ग्रेफाइट, लाइम आणि स्काय ब्लू कलरमध्ये उपलब्ध असेल. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह Samsung Galaxy S23 Ultra च्या बेस मॉडेलची किंमत 1,24,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे, Galaxy S23 Ultra चे 512GB आणि 1TB प्रकार अनुक्रमे 13,4,999 रुपये आणि 15,4,999 रुपयांना उपलब्ध असतील.

Galaxy S23 Ultra चे ग्लोबल व्हेरिएंट 8GB रॅम ऑफर करते, तर भारतीय व्हेरिएंट तिन्ही स्टोरेज पर्यायांसह 12GB रॅम ऑफर करते. S23 चार रंगांच्या पर्यायांमध्ये येईल - फॅंटम ब्लॅक, क्रीम, ग्रीन आणि लॅव्हेंडर शेड्स. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह Galaxy S23 च्या बेस मॉडेलची किंमत 74,999 रुपये आहे तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 79,999 रुपये आहे. S23 अल्ट्रा प्रमाणेच, Galaxy S23 आणि Galaxy S23+ देखील 1 फेब्रुवारीपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले आहेत.