Samsung New Phone : Samsung ने पुन्हा एकदा त्यांचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ‘ Samsung Galaxy M04 ’ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. या फोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम आणि MediaTek Helio P 35 प्रोसेसर सोबत मिळणार आहे. या फोनच्या बॅटरीची क्षमता 5000 mAh असून 13 मेगापिक्सेल प्राईमरी कॅमेरा सपोर्ट आहे. Samsung Galaxy M04 सह, कंपनी दोन वर्षासाठी ऑपरेटिंग सिस्टीम अद्यतने देखील प्रदान करणार आहे. या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत चला तर जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
Samsung Galaxy M04 किंमत
- Samsung Galaxy M04 सिंगल स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला असून या फोनची किंमत 8,499 रुपये आहे
- ग्रीन, गोल्ड, व्हाईट आणि ब्लू अशा चार रंगाच्या पर्यायांमध्ये हा फोन उपलब्ध आहे
- हा फोन 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 पासून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर( Website ) आणि Amazon India वरून खरेदी करता येऊ शकतो
Samsung Galaxy M04 चे स्पेसिफिकेशन
- Samsung Galaxy M04 मध्ये 6.5 इंचाचा HD Plus PLS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो (720 X 1600 Pixels ) रिझोल्यूशनसह मिळतो
- या फोनमध्ये Android 12 आधारित OneUI उपलब्ध करू दिला आहे. तसेच कंपनीने दोन वर्षासाठी ऑपरेटिंग सिस्टम देण्याचे आश्वासन दिले आहे
- तुम्हाला या फोनमध्ये Android 14 पर्यंत अपडेट पाहायला मिळतील
- प्रोसेसिंग फोन MediaTek Helio प्रोसेसरने सुसज्ज आहे
- Samsung Galaxy M04 ला 4 GB RAM आणि 128 GB स्टोरेज मिळेल
- RAM 8 GB पर्यंत वाढवता येऊ शकते (4 GB + 4 GB व्हर्चुअल)
- मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते
- सुरक्षेसाठी फोनमध्ये फेस अनलॉक बायोमेटिक ओळख वैशिष्ट्य देखील देण्यात आले आहे
Samsung Galaxy M04 चा कॅमेरा
- Samsung Galaxy M04 सह ड्युअल कॅमेरा सपोर्ट आहे, ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे
- दुय्यम कॅमेरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. मागील कॅमेरासह LED फ्लॅश उपलब्ध आहे
- सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे
Samsung Galaxy M04 ची बॅटरी लाईफ
- या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी लाईफ असून जी 10 W चार्जिंग सपोर्टसह मिळते. USB Type - C पोर्टची चार्जिंग पिन देण्यात आली आहे
- कनेक्टीव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम, 4 G VoLTE , Wi - Fi , ब्लूटूथ आणि GPS सपोर्ट देण्यात आला आहे