Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सॅमसंगची दिवाळी! Samsung Mobile ची रेकॉर्डब्रेक विक्री, कंपनीची 14000 कोटींची कमाई

Samsung Mobile Sale, Samsung Smartphones , Samsung India

Image Source : www.samsung.com

Samsung Mobile Sale 2022 : सणासुदीच्या हंगामात ऑफर्सचा पाऊस आणि ई-कॉमर्स कंपन्यांची साथ लाभल्याने यंदा दक्षिण कोरियाची मोबाईल उत्पादक सॅमसंगसाठी दिवाळी खास ठरली आहे. दसरा-दिवाळीत सॅमसंगने तब्बल 14,400 कोटींची कमाई केली.

Samsung Festive Season Sale : स्मार्टफोन मार्केटमध्ये पुन्हा एकदा सॅमसंगने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीत सॅमसंगने मोबाईल विक्रीतून 14,400 कोटींचे उत्पन्न मिळवले. फेस्टिव्ह सिझनमध्ये प्रिमियम सेगमेंटमधील मोबाईल्सच्या विक्रीत प्रचंड वाढ झाल्याने कंपनीनं यंदाच्या दिवाळीत मोठी कमाई केली. (Samsung logs Rs 14,400 cr revenue in India in festive Sep-Oct period)

सॅमसंग इंडिया स्मार्टफोन्स मार्केटमध्ये पहिल्या स्थानावर आहे. कंपनीच्य गॅलक्सी एस 22  (Galaxy S22)आणि नुकताच लॉंच करण्यात आलेल्या फोल्डेबल स्मार्टफोनची (Galaxy Z Fold4 and Z Flip4)  दिवाळीत जोरदार विक्री झाल्याचे कंपनीने म्हटलं आहे. केवळ स्मार्टफोन्सची विक्री नाही तर स्मार्टवॉच आणि सॅमसंग टॅबलेटची दसरा दिवाळीत मोठी विक्री झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. प्रिमियम श्रेणीतील स्मार्टफोन्स विक्रीने आजवरचा रेकॉर्ड मोडला आहे. कंपनीला या श्रेणीतून 30,000 कोटींचा महसूल मिळाला.

काउंटर पॉइंट रिसर्चच्या आकडेवारीनुसार सॅमसंग देशातील सर्वात वेगाने वाढणारा स्मार्टफोन ब्रॅंड (Samsung Mobile Profit 2022) ठरला आहे.2022 मध्ये पहिल्या सहामाहीत जानेवारी ते सप्टेंबर या काळात सॅमसंग मोबाईल विक्री अव्वल स्थानी आहे. नुकताच भारतात सुरु झालेल्या 5G सेवेत मोबाईल विक्रीत सॅमसंगने आघाडी घेतल आहे.  5G स्मार्टफोन्सची विस्तृत श्रेणी सॅमंसंगकडे आहे. जवळपास 20 हून अधिक 5G स्मार्टफोन कंपनीने आतापर्यंत बाजारात दाखल केले आहेत.

गेल्या महिन्यात अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिफकार्ट बिग बिलियन डे या दोन मोठ्या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सॅमसंगच्या बहुतेक स्मार्टफोनवर सवलत देण्यात आली होती. कंपनीच्या एकूण विक्रीत ऑनलाईन सेलचा मोठा वाटा होता. सॅमसंगने प्रिमियम स्मार्टफोन्ससाठी सॅमसंग फायनान्स हा अर्थपुरवठ्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करुन दिला होता. त्याचाही विक्री वाढण्यास फायदा झाल्याचे कंपनीने म्हटलं आहे.