Samsung 5G Laptop: टेलिकॉम कंपन्यांचे(Telecom Company) जाळे आता संपूर्ण देशात विस्तारले आहे. एअरटेल(Airtel) आणि जिओने(Jio) सध्या तरी ट्रायल पिरिएडसाठी फुकटात 5G सेवा देत आहेत. अनेकजण आजही वर्क फ्रॉम होम(WFH) करत आहेत. यामुळे घरात सतत वायफायची गरज भासते किंवा मोबाईलचा हॉटस्पॉट कनेक्ट लागतो. याच समस्येला हेरून Samsung कंपनीने 5G चे सिमकार्ड टाकता येणारा लॅपटॉप लाँच केला आहे. या अनोख्या लॅपटॉपचे फीचर्स जाणून घेऊयात.
Samsung Galaxy Book2 Go 5G लॅपटॉप UK मध्ये लॉन्च
Galaxy Book2 Go 5G हा Galaxy Book Go याच सिरीजचा नवीन मेंबर असून काही दिवसांपूर्वी कंपनीने Galaxy Book2 Go आणला होता. Galaxy Book2 Go 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 7c+ Gen 3 प्रोसेसर दिला आहे. 14 इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले या लॅपटॉपमध्ये देण्यात आला आहे. सध्या हा लॅपटॉप UK मध्ये लॉन्च झाला आहे.
Samsung Galaxy Book2 Go 5G चे फीचर्स जाणून घ्या
हा लॅपटॉप लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात येईल. Galaxy Book2 Go 5G मध्ये eSIM+pSIM कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. याशिवाय विंडोज 11 होम ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी यात Qualcomm Adreno GPU समाविष्ट करण्यात आले आहे. लॅपटॉपला 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध करून दिले जात आहे.
एचडी वेबकॅमसह कनेक्टिव्हिटीसाठी, Wi-Fi 6E (802.11ax), ब्लूटूथ, 5G ENDC आणि USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. यात नॅनो सिम स्लॉट असून Galaxy Book2 Go 45W चार्जिंगला सपोर्ट असलेली 42.3Wh बॅटरी पॅक आहे.
यामध्ये 4GB RAM सह 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत जवळपास 64,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8 GB रॅम सह 256 GB स्टोरेजची किंमत सुमारे 74,900 रुपये असणार आहे.