Shri Jyotiba Devasthan: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारा दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थानच्या जमिनीची परस्पर विक्री (Sale of Jyotiba Devasthan land) केल्याची माहिती समोर आली आहे. या देवस्थानची महाराष्ट्रामधील सातारा(Satara), गोवा(Goa) व कर्नाटक(Karnataka) राज्यात जमीन आहे. यातील 400 एकर जमिनीपैकी 200 ते 250 एकर जमिनीची परस्पर व्रिकी झाल्याचे समोर आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती(Kolhapur District Administration and West Maharashtra Devasthan Committee) या जमिनींचा शोध घेऊन त्या जमिनी जोतिबा मंदिराच्या ताब्यात देणार आहेत. यासंदर्भात तहसिलदारांना जमिनीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारा दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थानच्या जमिनीच्या सात बारावर श्री जोतिबा देवस्थान (Sale of Shree Jyotiba Devasthan land) असे नोंदवण्यात आले असताना इतर हक्कात ज्यांची नावे लागली आहे, त्या लोकांनी काही जमिनी आपल्याजवळ ठेवल्या आहेत असे समोर आले आहे, तर बहुतांश जमिनींचे परस्पर विक्री व्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. जोतिबा मंदिराच्या नावावर एकूण 400 एकर जमीन असून ही जमीन कर्नाटक(Karnataka), गोवा(Goa), कोकण(Kokan), सातारा(Satara) इ. ठिकाणी असून या सर्व ठिकाणांहून जोतिबा मंदिरासाठी मोठ्या प्रमाणावर खंड येत असला, तरीही या जमिनी नेमक्या कोणाच्या ताब्यात आहेत याची नोंद अजून ही मिळालेली नाहीये.
ज्या ठिकाणी या जमिनी आहेत त्या ठिकाणच्या सातबारा उताऱ्यावर जोतिबा मंदिराचे नाव आहे. खंडाच्या मोबदल्यात जमिनी कसायला घेतल्या आणि त्याच जमिनी इतरांना परस्पर विक्री केल्याचे सध्या बोलले जात आहे. यामध्ये खंड देऊन ताब्यात असलेल्या जमिनीवर थेट मालकी हक्क दाखवून मनमानी कारभार केल्याचे समोर आले आहे. इतर हक्कातील नावाचा आधार घेत इतरांनाही जमीन विक्री केल्याचे आढळून आले असून जोतिबा देवस्थानची जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जोतिबासह 28 गावांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार
जोतिबा मंदिरासोबतच 28 गावांच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. प्राधिकरणाचा प्रस्ताव 25 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले असून प्राधिकरणासाठी आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore) यांनी पाठपुरावा केला होता. जोतिबा मंदिरासोबतच नजीकच्या परिसराचा विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात(Sahyadri Atithi Gruh) बैठक आयोजित करण्यात आली. यासंदर्भात विनय कोरे यांनी प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे समोर आले आहे.