Richest Village in India: भारत देशात अनेक राज्ये आहेत. प्रत्येक राज्याचे आपले-आपले वैशिष्टये आहे. या राज्यांची खासियतदेखील अनोखी आहे. देशात असे एक राज्य आहे की, या राज्यात सर्वात श्रीमंत लोक राहतात. विशेष म्हणजे हे जगातील एकमेव असे गाव आहे. चला, तर मग जाणून घेऊयात या गावाविषयी.
भारतातील कोणते गाव?
जगातील सर्वाधिक श्रीमंत गाव हे गुजरात राज्यात आहे. कच्छ येथे असलेल्या या गावाचे नाव माडपार असे आहे. या गावात राहणारे लोक शहरांमध्ये राहणाऱ्या भारताच्या लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक श्रीमंत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या गावात 17 बँका असून 7600 हून अधिक घरे आहेत. अहवालानुसार, या गावातील लोकांचे सुमारे पाच हजार कोटी रुपये बँकांमध्ये जमा आहेत. कच्छ जिल्ह्यातील या गावात प्रत्येक व्यक्तींच्या बँक खात्यात 15 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अहवालात असे म्हटले आहे की, या गावात बँकेशिवाय रुग्णालय, तलाव, उद्याने आणि मंदिरे आहेत. गोशाळाही येथे आहे. या गावात सध्या शाळा-कॉलेज, हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. या गावातील लोकांच्या संपत्तीमागे एक कारण आहे. वास्तविक या गावातील बहुतांश लोक परदेशात काम करतात. अनेक वर्षे परदेशात राहिल्यानंतर काही लोकांनी येथे व्यवसाय सुरू केला असून त्यांची भरपूर कमाई होते.
65% लोक एनआरआय
जगातील सर्वात श्रीमंत गाव असलेल्या माडपारमधील 65 टक्के लोक अनिवासी भारतीय असल्याचे, एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. परदेशात राहणारे लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांना भरपूर पैसे पाठवतात.
लंडनशी विशेष संबंध
1968 साली लंडनमध्ये माडपार व्हिलेज असोसिएशनची स्थापना झाली. लंडनमध्ये मोठ्या संख्येने या गावाची लोकं राहतात. येथील लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी ही संघटना तयार केली आहे. आजही या गावातील लोक मोठ्या संख्येने परदेशात राहतात. परदेशात राहणारे लोक त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड पैसा पाठवतात. यामुळे येथील लोकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये आहेत.