Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Repo Rate: ऑगस्टमधल्या पतधोरण बैठकीत रेपो रेट वाढवला जाणार नाही, SBI चेयरमन दिनेश खारा यांनी दिली माहिती

Repo Rate

Image Source : www.grihashakti.com

सध्या देशांतर्गत मागणी अधिक असल्याने उत्पादन क्षेत्र देखील तेजीत असल्याचे SBI चेयरमन दिनेश खारा यांनी म्हटले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील क्षमता विस्तारासाठी गुंतवणूकीची गरज निर्माण झाली असून, येत्या काळात कॉर्पोरेट क्षेत्र भांडवली खर्च सुरू करू शकते असे त्यांनी म्हटले आहे.

आरबीआय ऑगस्टमध्ये होणाऱ्या द्वि-मासिक आर्थिक आढाव्यात व्याजदरात बदल करणार नाही अशी माहिती SBI चे अध्यक्ष दिनेश खारा यांनी दिली आहे. भारतातील महागाई आटोक्यात येत असल्यामुळे RBI असा निर्णय घेऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. पतधोरण ठरवताना देशातील घाऊक, किरकोळ महागाई यांच्यासोबतच इतर अनेक मुद्दे लक्षात घेऊन निर्णय घेतला जातो, त्यामुळे सध्या देशभरात जे काही चित्र आहे, त्याचा अंदाज घेता रेपो रेटमध्ये कुठलीही वाढ होणार नाही असे ते म्हणाले.

महागाई कमी होते आहे…

पतधोरण ठरवताना महागाई हा खरे तर मुख्य मुद्दा असतो. गेल्या काही महिन्यांत देशातील महागी नियंत्रणात येत असल्याचे ते म्हणाले. तसेच सामान्य नागरिकांची खरेदी क्षमता देखील वाढली आहे असे ते म्हणाले. एका बँकेचे प्रतिनिधी म्हणून रेपो रेट दरात वाढ होणार नाही असे आम्हांला वाटते असे मत त्यांनी नोंदवले.  RBI ची MPC बैठक येत्या 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. जून मध्ये पार पडलेल्या पतधोरण बैठकीत सलग  दुसऱ्यांदा रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. सामान्य कर्जदारांना यामुळे दिलासा मिळाला होता.

देशांतर्गत खप वाढला

सध्या देशांतर्गत मागणी अधिक असल्याने उत्पादन क्षेत्र देखील तेजीत असल्याचे खारा यांनी म्हटले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील क्षमता विस्तारासाठी गुंतवणूकीची गरज निर्माण झाली असून, येत्या काळात कॉर्पोरेट क्षेत्र भांडवली खर्च सुरू करू शकते असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या देशभरात पावसाचे आगमन झाल्यामुळे, जनजीवन प्रभावित झाले आहे. भाजीपाला, कडधान्ये, डाळी यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली असून, लवकरच ही परिस्थिती नियंत्रणात आणली जाणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. या सर्वांचा एकूण उत्पादन क्षेत्रावर दूरगामी परिणाम जाणवणार नाहीये, असे जाणकार सांगतात.

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) पुढील बैठक 8 ते 10 ऑगस्ट 2023 दरम्यान होणार आहे. मागील पतधोरण बैठकीत रेपो रेट न वाढवण्याचा निर्णय समितीने घेतला होता. त्यावेळी देशातील महागाई आटोक्यात आली असल्याने RBI ने असा निर्णय घेतल्याचे जाणकारांनी म्हटले होते. यावेळी देखील असाच निर्णय घेतला जाऊ शकतो आणि रेपो रेट ‘जैसे थे’ राहतील असे म्हटले जात आहे.

8 जूनच्या चलनविषयक आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपोमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. मात्र, त्याचवेळी महागाई आणखी खाली यावी, असे केंद्रीय बँकेने म्हटले होते.