तुम्ही जर वनप्लस मोबाईल फोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आली आहे. वनप्लस कंपनी पुढील काही महिन्यांत भारतात लेटेस्ट नॉर्ड सीरीजचे स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना आखत आहे. OnePlus 10R या मोबाईल फोनची तर अनेक लोक आतुरतेने वाट पाहतायेत. या फोनची किंमत कंपनीने मागील वर्षीच जाहीर केली होती. या किंमतीत कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याची बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार या स्मार्टफोनची किंमत 4000 रुपयांनी कमी केली आहे. महत्वाची बाब म्हणजे मागील वर्षी याच फोनची किंमत 3000 रुपयांनी कमी करण्यात आली होती. म्हणजेच दुसऱ्यांदा ही किंमत कमी केली जाणार आहे. नॉर्ड सीरिजच्या सर्व मोबाईल फोनला भारतीय बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसते आहे. याचाच परिणाम म्हणून कंपनीने मोबाईलच्या किमती कमी केल्या आहेत असे जाणकारांचे म्हणणे आहे.
This OnePlus smartphone with 150W charging support is now more affordable OnePlus is all set to launch its latest Nord series smartphones in India next month. Now the smartphone maker has slashed the price of its last year launched OnePlus 10R smartphone. This is the second … pic.twitter.com/TwI3XNCwES
— 4 Dollar Website (@4dollarwebsite) March 31, 2023
Table of contents [Show]
OnePlus 10R ची नवी किंमत
वनप्लस ने वनप्लस 10R मोबाईलचे व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. 8GB+128GB (80W), 12GB+256GB (80W) आणि 12GB+256GB (150W) अशी ही व्हेरिएंट आहेत. आवश्यकतेनुसार आणि बजेटनुसार लोक या मोबाईलच्या व्हेरिएंटची खरेदी करत असतात. भारतात हा मोबाईल लॉंच झाला तेव्हा या मोबाइलच्या किंमती अनुक्रमे 38,999 रुपये, 42,999 रुपये आणि 43,999 रुपये इतक्या होत्या.
आता दुसऱ्यांदा मोबाईल फोनच्या किंमतीत घट झाल्यानंतर ग्राहकांना 8GB+128GB (80W) व्हेरिएंटसाठी 31,999 रुपये आणि 12GB+256GB (80W) व्हेरिएंटसाठी 35,999 रुपये तर 12GB+256GB (150W) वेरिएंट खरेदीसाठी 36,999 रुपये मोजावे लागणार आहेत. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि फॉरेस्ट ग्रीन कलर ऑप्शन मध्ये सध्या उपलब्ध आहे.
सध्या अमेझॉन (Amazon) आणि रिलायंस डिजीटल (Reliance Digital) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे मोबाईल फोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
OnePlus 10R मोबाईलचे स्पेसिफिकेशन
वनप्लस 10R एक ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 8100-मॅक्स ऑक्टा-कोर मोबाईल आहे. यांत 12GB पर्यंत रॅम (RAM) आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह (Internal Store) पर्याय उपलब्ध आहेत . स्मार्टफोन एंड्रॉइड 13 सिस्टमवर काम करतो जो कंपनी ऑक्सीजनओएस 13 वर आधारित आहे.
या वनप्लस स्मार्टफोनसाठी 6.7 इंच एफएचडी प्लस फ्लूइड मोलेड डिस्प्ले उपलब्ध करून देण्यात आला आहे. डिस्प्ले 120 हर्ट्ज (120 Hertz Variable Refresh Rate) वेरिएबल रिफ्रेश रेट देखील देतो. या मोबाईलमध्ये ड्यूल सिम (Dual SIM) ची सुविधा देखील देण्यात आली आहे.
फोटोग्राफरची पसंती!
फोटोग्राफीसाठी OnePlus मोबाईल बेस्ट ऑप्शन आहे असे मानले जाते. या फोनमध्ये, ट्रिपल रेअर कॅमेरा (Triple Rare Camera) सेटअप देण्यात आला आहे, 50 मेगापिक्सेल (50 Megapixel) मेन कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा (Ultra-wide Camera) आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स या दिल्या गेल्या आहेत. सोबतच16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा (Selfie Camera) देण्यात आला आहे.
बॅटरी होणार झटपट चार्ज
वनप्लसचे स्मार्टफोन झटपट चार्जिंगसाठी ओळखले जातात. मोबाईल फोनची बॅटरी अधिक काळ टिकावी यासाठी लोक OnePlus ला पसंती देताना आढळतात. स्मार्टफोनचा एक व्हेरियंट 150W सह सुपरवूक एंड्योरेंस एडिशन मध्ये उपलब्ध असून दुसरा 80W सुपरवूक एडिशनसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. 80W सुपरवूकसह स्मार्टफोन 5,000 MAH बॅटरी पॅक, 32 मिनिटांत 1 ते 100% चार्ज केला जाऊ शकतो. वनप्लस 10R 150 वॉटवोक एंड्योरेंस एडिशनचा स्मार्टफोन 4500 MAH बॅटरी पॅकसह उपलब्ध असून, 3 मिनिटांत 1 ते 30% बॅटरी चार्ज केली जाऊ शकते.