बँकांमध्ये एफडींमध्ये (Bank FD) गुंतवणूक करण्यासोबतच ग्राहक आरडींचाही पर्याय निवडत आहेत. विविध बँकांकडून एफडी आणि आरडी साठी विविध व्याजदर ऑफर केले जातात. मागील काही दिवसांपासून बँकांचे कर्ज महागण्याबरोबरच बँक योजनांमध्येही विक्रमी वाढ झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय बँकेसह (ICICI Bank) अनेक मोठ्या बँकांनी मुदत ठेवींवरील व्याज तसेच आरडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. सध्या अनेक बँका आरडीवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज देत आहेत. हे व्याजदर वेगवेगळ्या कालावधीसाठी बँकेनुसार बदलू शकतात. जर तुम्हाला आरडीमध्ये गुंतवणूक (Recurring Deposit) करायची असेल तर कोणत्या बँकेत जास्त व्याज मिळत आहे ते माहीत असणे फायद्याचे ठरेल.
Table of contents [Show]
पीएनबी बँकेत आरडीवरील व्याजदर
या बँकेच्या ग्राहकांना आरडीवर 5.5 टक्के ते 7.25 टक्के व्याज मिळत आहे. ज्याची मॅच्युरिटी 6 महिने आणि 10 वर्षे आहे. हे व्याजदर 20 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.
एसबीआय आरडी व्याज दर
देशातील मुख्य बँक एसबीआय तिच्या ग्राहकांसाठी 12 ते 120 महिन्यांच्या कालावधीसाठी 6.80 टक्के आणि 7 टक्के व्याज ऑफर करत आहे. यामध्ये दरमहा किमान 100 रुपये गुंतवले जाऊ शकतात. हे नवे व्याजदर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. ठेवीदाराने 6 वा हप्ता भरला नाही तर या परिस्थितीत बँक खाते बंद करू शकते, आणि जमा केलेले पैसे ठेवीदाराला परत केले जातील.
एचडीएफसी बँकेचे आरडीवरील व्याजदर
ही खाजगी क्षेत्रातील बँक आरडीवर 4.5 टक्के आणि 7.10 टक्के व्याजदर देत आहे, ज्याचा कार्यकाळ 6 महिने ते 120 महिन्यांदरम्यान आहे. 15 महिन्यांच्या कालावधीवर 7.10 टक्के व्याजदर मिळत आहे. 24 फेब्रुवारी 2023 पासून हे व्याजदर लागू झाले आहेत. हा व्याजदर सर्वसामान्यांसाठी आहे.
आयसीआयसीआय बँकेत आरडीवर मिळणारे व्याज
आयसीआयसीआय बँकेच्या आरडीवर 4.75 टक्के आणि 7.10 टक्के व्याज नियमित ग्राहकांना 6 महिने ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ऑफर करण्यात आले आहे. यामध्ये तुम्ही किमान 500 रुपये गुंतवू शकता. हे व्याजदर 24 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.
येस बँकेतील आरडीवरील व्याज दर
येस बँक तिच्या नियमित ग्राहकांसाठी 6 महिने ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 6 टक्के आणि 7.50 टक्के व्याज दर ऑफर करत आहे. त्याच्या व्याजातील शेवटचा बदल 21 फेब्रुवारी रोजी झाला होता.
Recurring Deposit: SBI, HDFC, ICICI, other major banks increase interest rates (msn.com)