Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment In Real Estate: कमर्शिअल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करताय, हे 4 मुद्दे लक्षात घ्या!

Investment in Property , Commercial Property Investment

Investment In Real Estate: जर तुम्ही वाणिज्य मालमत्तेत (Commercial Property) गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही जिथे राहता? तिथे कमर्शियल इस्टेटमध्ये कितपत परतावा मिळू शकेल? नव्याने होणारे प्रोजेक्ट, आजुबाजूचे मार्केट यासासारख्या गोष्टींचा अभ्यास करणेही आवश्यक आहे.

गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून अनेक जण रिअल इस्टेटचा विचार करतात. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक म्हटली की पहिल्यांदा एखादी सदनिका (फ्लॅट) घेण्याचा प्लॅन डोक्यात येतो. मात्र यातले फारचं थोडेजण कमर्शियल (व्यावसायिक गाळे, गोदामे) रिअल इस्टेट यातही खासकरून दुकान गाळा घेण्याचा विचार करतात. निवासी मालमत्तेच्या तुलनेत कमर्शिअल प्रॉप्रर्टीमध्ये गुंतवणूक करताना जादा पैसे लागतात. थोडक्यात ही गुंतवणूक महागच असते. त्यामुळे यात गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन सर्रास होणाऱ्या चुका टाळता येतील आणि निर्णय घेणे सोपे होईल.  

जर तुम्ही वाणिज्य मालमत्तेत (Commercial Property) गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही जिथे राहता? तिथे कमर्शियल इस्टेटमध्ये कितपत परतावा मिळू शकेल? नव्याने होणारे प्रोजेक्ट, आजुबाजूचे मार्केट यासासारख्या गोष्टींचा अभ्यास करणेही आवश्यक आहे.

कमर्शियल इस्टेटमध्ये भाडे जास्त मिळते (Higher Rent)

निवासी सदनिका किंवा फ्लॅटपेक्षा दुकान गाळयातून मिळणारे उत्पन्न (भाडे उत्पन्न) तुलनेने अधिक मिळते. यामुळे काही जणांना यात गुंतवणूक करण्यात जास्त रस असतो.  फ्लॅटमध्ये गुंतवणूक केल्यावर वार्षिक केवळ 1% ते 3% रिटर्न  मिळू शकतो. कमर्शियल इस्टेटमध्ये मात्र वार्षिक 10% पर्यंतदेखील परतावा मिळू शकतो. यामुळे रिअल इस्टेटमधील गुंतावणुकीतून भाडे उत्पन्न मिळवणे हा हेतू असेल तर फ्लॅटपेक्षा कमर्शिअल प्रॉपर्टी एक पर्याय चांगला आहे.

भाडेउत्पन्न जास्त पण मोठी गुंतवणूक करावी लागते (Huge Investment Required)

व्यावसायिक गाळ्यातून भाडे जास्त मिळते. यामुळे काही जणांना याचे आकर्षण असले तरी यात गुंतवणूक देखील फ्लॅटपेक्षा तुलनेने जास्त करावी लागते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे कमर्शिअल प्रॉपर्टीचे दर हे फ्लॅटच्या तुलनेत दोन ते अडीच पट असतात. शिवाय लोकेशननुसार ते ठरवले जातात. यात गुंतवणूकदाराला प्रिमियम अर्थात बाजार भावापेक्षा जास्त रक्कम देऊन प्रॉपर्टी खरेदी करावी लागते.

कर्ज महाग असते (Higher Interest Rate) 

जेव्हा आपण गुंतवणुकीसाठी सदानिका आणि व्यावसायिक मालमत्ता यांच्यात तुलना करतो तेव्हा कर्जाचा मुद्दा विचारात घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा कर्ज काढून रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली जाते. या अशा वेळी दुकान गाळ्यावरील कर्ज महाग असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला व्याजाचे अधिकचे पैसे यात भरावे लागतात. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी व्याजदर किती आहे हे तपासून घेणे आवश्यक आहे.

लगेच भाडेकरु मिळणे कठीण  (Limited Demand)  

ज्यांनी भाड्याने उत्पन्न मिळवण्यासाठी दुकान गाळ्यात गुंतवणूक केली आहे त्यापैकी काहींना लगेच भाडेकरु (Commercial Tenants) मिळत नाहीत, असे लक्षात येते. कारण यासाठी अनामत रक्कम आणि मासिक भाडे तुलनेने जास्त असते. मोक्याच्या ठिकाणी योग्य भाडे न मिळाल्याने अनेक प्रॉपर्टी भाडेकरु न मिळाल्याने बंद असतात. या उलट फ्लॅटसाठी भाडेकरु लगेच मिळतात. ही बाबदेखील या गुंतवणुकीचा विचार करताना लक्षात घेणे आवश्यक आहे.