Real Estate Investment Trust: सध्याच्या महागाईमध्ये प्रॉपर्टीजच्या वाढलेल्या किमतींमुळे (Property Prices) बऱ्याच जणांची इच्छा असूनही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक (Real Estate Investment) करता येत नाही. प्लॉट(Plot), फ्लॅट(Flat) किंवा व्यावसायिक मालमत्ता(Commercial Property) खरेदी करायची असेल तर त्यासाठी मोठ्या रक्कमेची आवश्यकता असते. रिअल इस्टेट क्षेत्रात विचारपूर्वक केलेली गुंतवणूक तुम्हाला अनेक पटींनी परतावा देऊ शकते. त्यामुळेच तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे 'रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट'(Real Estate Investment Trust). याच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करु शकता. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
'REIT' म्हणजे नक्की काय?
म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Funds)ज्याप्रमाणे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून स्टॉक(Stocks) किंवा बाँडमध्ये(Bond) गुंतवणूक करता येते, अगदी त्याचप्रमाणे REITs गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करते. यामुळे REIT ला नियमित उत्पन्नही मिळून त्याने गुंतवलेल्या मालमत्तेचे मूल्य वाढत जाते व त्याचाही फायदा त्याला होतो. REIT व्यावसायिक मालमत्तेमध्ये(Commercial Property) गुंतवणूक करते. जसे की मॉल(Mall), शॉपिंग कॉम्प्लेक्स(Shopping Complex), बिझनेस पार्क(Business Park) इत्यादी यामध्ये समाविष्ट असू शकतात. या गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला भाड्याच्या(Rent) स्वरूपात नियमित उत्पन्न मिळण्यास मदत होते.
SEBI अंतर्गत REIT येते का?
SEBI ने 2015 मध्ये REIT साठी नियम तयार केले होते. ज्याअंतर्गत REIT मध्ये गुंतवणुकीसाठी अटी व शर्ती(Terms & Condition) घालण्यात आल्या होत्या. REIT ला त्यांच्या निधीपैकी 80 टक्के निधी पूर्णपणे बांधलेल्या आणि भाड्याने(Rent) मिळणाऱ्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवावा(Property Investment) लागतो. यापाठीमागे नियमित उत्पन्न(Income) मिळवणे हा उद्देश असतो. SEBI वेळोवेळी REIT शी संबंधित नियमांमध्ये आवश्यक ते बदल करत असते.
SEBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, REITs ला त्यांच्या उत्पन्नाच्या 90 टक्के हिस्सा गुंतवणूकदारांमध्ये वितरित करावा लागतो. ही रक्कम लाभांश किंवा व्याजाच्या स्वरूपात गुंतवणूकदारांना वितरित केली जाते. REITs मध्ये काही लाख गुंतवण्याची गरज नसल्यामुळे, सामान्य गुंतवणूकदारही यामध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमावू शकतात. सामान्य गुंतवणूकदार नियमित उत्पन्न मिळण्याची क्षमता असलेल्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक(Investment) करतात. मात्र गुंतवणुकीचा निर्णय हा तज्ञ घेत असतात.
किमान गुंतवणूक किती आहे?
अधिकाधिक गुंतवणूकदारांना REIT मध्ये गुंतवणूक करण्याची संधी देण्यासाठी SEBI ने हल्लीच एक छोटासा बदल केला आहे. सुरुवातीला, REITs मध्ये किमान गुंतवणूक(Investment) 2 लाख रुपये होती. नंतर SEBI ने ती कमी करत 50,000 रुपयांपर्यंत आणली. अलीकडे ती आणखी कमी करून 10,000 ते 15,000 रुपये करण्यात आली आहे. सध्या, देशातील स्टॉक एक्स्चेंजवर(Stock Exchange) दोन REIT सूचीबद्ध आहेत.