शेअर मार्केटमधील अस्थिरतेमुळे वर्ष 2022 म्युच्युअल फंडांसाठी संमिश्र गेले. डेट फंडांच्या तुलनेत लिक्विड फंडांची कामगिरी सरस ठरली. वर्ष 2022 मध्ये सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढवले. यामुळे बॉंड यिल्डमध्ये देखील वाढ झाल्याचे दिसून आले. जागतिक पातळीवर महागाई वाढल्याने सेंट्रल बँकांना पतधोरण कठोर करावे लागले. मात्र याच वेळी बॉंड यिल्ड वाढले तर डेट फंडांचे एनएव्ही कमी झाले होते. यामागे दोन मुख्य कारणे होती. डेट फंडात होणारी दिर्घकालीन गुंतवणूक आणि व्याजदर वाढीचे चक्र ज्याचा फटका डेट फंडांच्या कामगिरीला बसला होता.
मात्र डेट फंडासाठीचा हा खराब काळ आता सरला आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे. वर्ष 2023 डेट फंडांसाठी सकारात्मक ठरेल. भारतात व्याजदर वाढीचे सत्र जवळपास पूर्ण झाले आहे. रिझर्व्ह बँकेकडून फार फार तर आणखी एकदा रेपो दर वाढवला जाऊ शकतो. जेव्हा व्याजदर स्थिर असतील तेव्हा नेमका उलटा परिणाम बाजारावर होतो. जो परिणाम वर्ष 2022 मध्ये दिसून आला त्याच्या नेमका उलटा परिणाम 2023 मध्ये दिसून येईल, असे या क्षेत्रातील जाणकारांना वाटते.
डेट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी वर्ष 2023 मध्ये आपली गुंतवणुकीबाबत बचावात्मक पवित्रा बाळगण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ही गुंतवणूक लिक्विड फंडात काही महिने किंवा दिर्घकाळासाठी हस्तांतरीत करण्याचा सल्ला जाणकारांनी दिला आहे. सेबीच्या माहितीनुसार बाजारात डेट फंडांच्या 16 योजना आहेत. टार्गेट म्युच्युअल फंड हा असा एक पर्याय आहे ज्याची मुदतपूर्ती आणि मिळणारा परतावा याची सुस्पष्ट माहिती मिळते. यातील कोणत्याही फंड योजनेमध्ये काही महिने किंवा काही वर्षांसाठी गुंतवणूक करता येऊ शकते.
डेट फंड देतील बँकांच्या ठेवींप्रमाणे रिटर्न्स देतील
कॉर्पोरेट बॉंड फंड्स आमि बँकिंग अॅंड पीएसयू फंड्स या दोन योजनांमध्ये किमान 3 वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. सहा महिन्यांच्या थोड्या कालावधीसाठी गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्यांना लो ड्युरेशन फंड्स, मनी मार्केट फंड्स हे पर्याय आहेत. गव्हर्मेंट सिक्युरिटीज फंडांत सर्वसाधारणपणे 5 ते 10 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला गुंतवणूक सल्लागारांकडून दिला जातो. वर्ष 2023 चा विचार केला तर डेट म्युच्युअल फंडांना चांगली कामगिरी करण्यासाठी पोषक वातावरण आहे. डेट म्युच्युअल फंड बँकांच्या ठेंवींप्रमाणे परतावा देऊ शकतात. यात दिर्घकाळाचा विचार केला तर कर बचतीचा लाभ गुंतवणूकदारांना मिळणार आहे.