Quant Mutual Fund: क्वांट म्युच्युअल फंड हाऊसने अदानी ग्रुपमधील कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) रिपोर्टमध्ये अदानी उद्योग समुहाबाबतची माहिती बाहेर आल्यानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्या पार्श्वभूमीवर क्वांट म्युच्युअल फंड हाऊसने (Quant Mutual Fund House) अदानी कंपन्यांच्या गुंतवणुकीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अदानी ग्रुपमधील वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. यामुळे वैयक्तिक गौतम अदानी जागतिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतूनही बाहेर फेकले गेले. यामुळे अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळेच क्वांट म्युच्युअल फंड हाऊसने अदानी समुहाच्या कंपन्यांमधील गुंतवणूक थांबवण्याचा विचार केल्याचे बोलले जाते.
Table of contents [Show]
MF कंपन्या पोर्टफोलिओमध्ये सतत बदल करतात
मार्केटमधील तरलता आणि जोखमीचे (Market Liquidity & Risk) म्युच्युअल फंड कंपन्या सातत्याने निरीक्षण आणि अभ्यास करत असतात. त्यानुसार ते त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सतत बदल करतात. बरेच म्युच्युअल फंड हाऊस हीच स्ट्रॅटेजी वापरतात. जेणेकरून म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकदारांना चांगला परतावा देता येईल. अशाच पद्धतीने क्वांट म्युच्युअल फंड हाऊसने विचार केला असेल, असे मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
MFमधील पोर्टफोलिोचे व्यवस्थापन डायनॅमिक
क्वांट म्युच्युअल फंडचे सीईओ संदीप टंडन यांनी सीएनबीसी आवाज (CNBC AWAJ) या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते की, आम्ही म्युच्युअल फंडमधील पोर्टफोलिओचे व्यवस्थापन डायनॅमिक पद्धतीने करत असतो. मार्केटमधील स्थिती बदलली की, आमचा निर्णय किंवा दृष्टिकोनही बदलतो. अशावेळी कोणता निर्णय घेणे उचित ठरेल. हे प्रायोरिटीने ठरवून त्याचा लगेच निर्णय घेतला जातो. कोणतेही पारंपरिक फंड हाऊस अशाच पद्धीचा अॅप्रोच ठेवून गुंतवणूक करत असतात.
2022 मध्ये अदानींच्या शेअर्समध्ये वाढ
2022 या मध्ये अदानी ग्रुपमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परिणामी क्वांट म्युच्युअल फंडमधील विविध स्कीमसलाही चांगला परतावा मिळाला होता. 2021 आणि 2022 मध्ये क्वांट म्युच्युअल फंडमधील अॅब्सोल्यूट फंडने अनुक्रमे 44 आणि 13 टक्के परतावा दिला होता. तर क्वांट फोकस फंडने या दोन वर्षांत अनुक्रमे 35.6 ाणि 9.68 टक्के इतका परतावा दिला होता. पण फेब्रवारी महिन्याच्या सुरूवातीलाच अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण सुरू झाल्यामुळे क्वांट म्युच्युअल फंड हाऊसने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये पडझड
अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्च कंपनीने 24 जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे अदानी ग्रुपमधील अनेक कंपन्यांचे शेअर्स खाली आले आहेत. या रिपोटनंतर अदानी ग्रुपचे बाजरातील भांडवल मूल्य अब्जावधी कोटींनी कमी झाले. यामुळे गौतम अदानी हे जागतिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.
क्वांट म्युच्युअल फंड्सला फटका
अदानी ग्रुपमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे क्वांट म्युच्युअल फंड हाऊसमधील वेगवेगळ्या फंड्सना याचा फटका बसला आहे. क्वांटचा इन्फ्रास्ट्रक्चर फंड 24 जानेवारीपासून 8.9 टक्क्यांनी खाली आला आहे. तर क्वांट टॅक्स प्लॅन हा फंड 7.7 टक्क्यांनी खाली आला आहे. क्वांट म्युच्युअल फंडमधून गुंतवणूकदारांनी एकाएकी बाहेर पडण्याचा लगेच निर्णय घेतल्यास त्यांना नुकसान सहन करावे लागेल.
(डिसक्लेमर: शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स किंवा म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)