Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Quant Small Cap फंडाची चमकदार कामगिरी, 3 वर्षात किती दिले रिटर्न ते घ्या जाणून

Quant Small Cap

Quant Small Cap फंडाने चमकदार कामगिरी नोंदवली आहे. मागील 3 वर्षाचा विचार केला तर या फंडाने आकर्षक रिटर्न दिल्याचे दिसून येतेय.

शेअर बाजाराचा लाभ मिळवण्यासाठी अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. त्यातही अनेक जण स्मॉल कॅप फंडाची निवड गुंतवणूकीसाठी करतात. अशाच एका Quant Small Cap Fund Direct Plan Growth या फंडाविषयी जाणून घेऊया. 

एकरकमी 1 लाख गुंतवणूकीवर मिळाला असता ‘असा’ परतावा  

Quant Small Cap फंडाने मागील वर्षी चमकदार कामगिरी केली आहे. 16 डिसेंबर 2022 रोजी या फंडाची NAV 154.28 रुपये इतकी होती. या फंडाला 5 स्टार इतके रेटिंग आहे. फंड साईझ 2 हजार 580 कोटी रुपये इतका आहे. एक वर्षापूर्वी जर कुणी यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला 11.86 टक्के इतका आता परतावा मिळाला आहे. म्हणजेच 1 लाख रुपये गुंतवणूकीचे 1 लाख 11 हजार 860 रुपये झाले असते. 

3 वर्षासाठी यात कुणी 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याच्या गुंतवणूकीचे आता 3 लाख 84 हजार 849 रुपये झाले असते. तब्बल 284.84 टक्के इतका हा परतावा आहे. हेच  5 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता 2 लाख 98 हजार 881 रुपये इतका परतावा मिळाला असता. 198.88 टक्के इतके हे रिटर्न आहेत. 

SIP मुळे मिळाला असता ‘असा’ परतावा 

या स्कीममध्ये कमीत कमी 1 हजार रुपयांची एसआयपी उघडता येते. जर कुणी 3 वर्षापूर्वी 1 हजार रुपयांची एसआयपी उघडली असती तर आता 71 हजार 293 म्हणजे 98.03 टक्के इतकी अमाऊंट तयार झाली असती. 1 हजार रुपयांची एसआयपी 5 वर्षापूर्वी काढली असती तर आज 145.76 टक्के परताव्यासह 1 लाख 47 हजार 460 इतकी अमाऊंट तयार झाली असती.  

एकूणच Quant Small Cap फंडाने चमकदार रिटर्न दिलेले दिसून येत आहेत. मात्र म्युच्युअल फंडची निवड करताना अनेक बाबींचा विचार करणे आवश्यक असते. त्यातल्या जोखमीचा विचार करणेही आवश्यक असते. इक्विटी म्युच्युअल फंडाचे रिटर्न हे फंड मॅनेजरच्या तसेच बाजाराच्या कामगिरीवरही अवलंबून असतात. शिवाय मागील कामगिरीची भविष्यातही पुनरावृत्ती होईलच याची हमी देता येत नसते. हेदेखील लक्षात घेणे महत्वाचे असते.  

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)