Potato : आपण दररोज विविध पालेभाज्या आणि फळभाज्या खातो. भाज्यांचा राजा म्हणून प्रसिध्द असलेल्या एक किलो बटाट्याची किंमत सगळ्यात महागड्या शहरात देखील 60 ते 100 रुपये किलो पेक्षा जास्त नसणार. मग तुम्हाला आता हा प्रश्न नक्कीच पडत असेल की, याच बटाट्यात असे काय आहे? हा बटाटा सोन्याचा तर नाही ना? तर बटाट्याच्या अश्या विविध जाती शहरात आहे, ज्या सोन्याच्या भावाने विकल्या जातात. म्हणजेच एक किलो बटाट्यासाठी तुम्हाला कमीत- कमी 40,000 ते 50,000 रुपये मोजावे लागतील. बटाट्याच्या या दुर्मिळ जातीचे नाव ले बोनॉट बटाटा (Le Bonnotte Potato ) आहे. ही बटाट्याची अतिशय दुर्मिळ वाण मानली जाते. आणि मुख्य म्हणजे हे बटाटे वर्षातुन केवळ 10 दिवस उपलब्ध असतात. या बटाट्यांचा उगम फ्रान्समधील इले डी नॉयरमाउटियर बेटावर होतो.
Table of contents [Show]
का आहेत हे बटाटे इतके महागडे
या बटाट्याचं पिक 50 चौरस मीटर वालुकामय जमिनीवर घेतल्या जाते. यासाठी सीव्हीड आणि शैवाळ हे नैसर्गिक खत म्हणून वापरले जाते. त्यामुळे तो जगातील सगळ्यात महागडा बटाटा ठरतो, कारण हा अतिशय नैसर्गिक पध्दतीने उत्पादित केल्या जातो.
ले बोनॉट बटाट्याची चव
तसेच हा बटाटा देखील इतर बटाट्यांपेक्षा वेगळा ठरतो कारण, ले बोनॉट बटाट्याची चव लिंबू सारखी आंबट तसेच थोडी खारट आहे. त्यामुळे या बटाट्याचा प्रकार इतर बटाट्यांपेक्षा वेगळा आहे. विशेषत: हे बटाटे दरवर्षी केवळ एका आठवड्यासाठी उपलब्ध होतात आणि सालासकट खाल्ले जातात.
काय आहे वेगळेपणा
फ्रान्समधील इले डी नॉयरमाउटियर बेटावर अश्या प्रकारच्या विविध बटाट्यांचं पिक घेतल्या जाते. मात्र ले बोनॉट बटाट्याची चव, त्यातील नैसर्गिक घटक, त्याची गुणवत्ता, त्यातील शरीरास उपयोगी असे घटक पदार्थ यासारख्या अनेक गुणधर्मामुळे Le Bonnotte Potato वेगळा ठरतो. हे दुर्मिळ बटाटे काळजीपूर्वक निवडण्यासाठी तब्बल सात दिवस हजारो कामगार व्यस्त असतात.
विविध बटाट्यांचे प्रकार
- कुफरी चंद्रमुखी
- कुफरी ज्योती
- कुफरी सिंदुरी
- कुफरी जवाहर
- युकॉन गोल्ड बटाटा
- रसेट बटाटे
- लाल बटाटा
- पांढरे बटाटे
- पिवळा बटाटा
- जांभळा बटाटा