Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Monthly Income Scheme: स्मार्ट बना! पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेतून मिळणारा परतावा वाढवा

Post Office Monthly Income Scheme

शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यासारख्या जोखीम असलेल्या पर्यायांमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची नसेल किंवा तेवढी तुमची जोखीम उचलायची क्षमता नसेल तर तुम्ही पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत पैसे गुंतवू शकता. पाचवर्षांपर्यंत तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेतून मिळणारा वार्षिक 6.6% व्याजदर तुम्हाला कमी वाटत असेल तर स्मार्ट पद्धतीने तुम्ही मिळालेले व्याज पुन्हा गुंतवून अधिक परतावा मिळवू शकता.

शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यासारख्या जोखीम असलेल्या पर्यायांमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची नसेल किंवा तेवढी तुमची जोखीम उचलायची क्षमता नसेल तर तुम्ही पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत (Post Office Monthly Income Scheme) पैसे गुंतवू शकता. कमी जोखीम मात्र, हमखास परतावा मिळण्यासाठी तुम्ही या योजनेचा विचार करु शकता. सुमारे ६.६ टक्के वार्षिक परतावा या योजनेतून मिळतो. पाचवर्षांपर्यंत तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता. ६.६ व्याजदर तुम्हाला कमी वाटत असेल तर स्मार्ट पद्धतीने तुम्ही मिळालेले व्याज पुन्हा गुंतवून अधिक परतावा मिळवू शकता. ते कसे पाहूया. 

दरमहा व्याज -

सर्वप्रथम मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही पैसे गुंतवल्यानंतर तुम्ही दोन प्रकारे व्याज मिळवू शकता. एक म्हणजे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन व्याजाचे पैसे काढू शकता किंवा तुमच्या बँकेच्या बचत खात्यात दर महिन्याला पैसे वळवून घेऊ शकता. जास्तीत जास्त तुम्ही साडेचार लाख रुपये या योजनेत गुंतवू शकता. मात्र, संयुक्त खाते असेल तर नऊ लाख रुपये योजनेत गुंतवू शकता. पाच वर्षांचा कालावधी या योजनेसाठी आहे. मात्र, जर तुम्ही त्याआधीच पैसे काढून घेत असाल तर तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो.

महिन्याला मिळणारे व्याज आवर्ती ठेवीत (RD) गुंतवा -

समजा तुम्ही साडेचार लाख रुपये या योजनेत गुंतवले त्यातून तुम्हाला महिन्याला सुमारे अडीच हजार रुपये व्याज मिळेल. हे व्याजाचे पैसे तुम्ही आवर्ती ठेवीमध्ये गुंतवले तर पाच वर्षांनंतर तुम्हाला अधिक नफा मिळेल. पाच वर्षानंतर तुमची मुद्दलही तुम्हाला मिळले आणि व्याज आणि आरडीद्वारे अधिकचा परतावा तुम्हाला मिळेल. या योजनेमध्ये तुम्ही कमीतकमी १ हजार रुपये ते जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये गुंतवू शकता. मात्र, संयुक्त खाते असेल तर कमीत कमी १ हजार आणि कमाल ९ लाख रुपये गुंतवू शकता. 

या योजनेतून मिळणारा परतावा करपात्र आहे. म्हणजेच 80C अंतर्गत तुम्ही गुंतवलेल्या रकमेला करातून सुटका नाही. जे काही व्याज मिळेल ती रक्कम करपात्र राहिल. फक्त तुम्ही व्याज दर महिन्याला काढत असाल किंवा खात्यात तसेच पडून राहत असेल तर त्यावर व्याज मिळत नाही.