Poonawalla Fincorp Credit Card: डिजिटल क्रेडिट, शॉपिंग आणि इतर ऑनलाइन फायनान्शिअल सेवांची वाढ मागील काही वर्षात झपाट्याने झाली आहे. त्यामुळे अनेक फिनटेक कंपन्या किरकोळ कर्ज व्यवसायात उतरत आहेत. पुनावाला फिनकॉर्प इंडसंड बँकेसोबत मिळून को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कंपनीला नुकतीच परवानगी मिळाली आहे.
कोणत्या सेवा पुरवण्यात येणार?
पुढील तीन महिन्यात पुनावाला फिनकॉर्पचे क्रेडिट कार्ड लाँच होईल. या कार्डद्वारे किरकोळ लोन, शॉपिंग, विविध बिल पेमेंट्स, हॉटेल, टॅव्हल, इंटरेस्ट फ्री क्रेडिट, डिस्काउंट आणि ऑफर्स मिळतील. आघाडीचे शॉपिंग ब्रँड्स आणि कंपन्यांसोबत कंपनी टायअप करण्याची शक्यता आहे. तसेच क्रेडिट कार्डचे व्यवहार आणि सर्व सुविधा या डिजिटल असणार आहे. त्यासाठी इंडसंड बँकेची मदत कंपनीने घेतली आहे.
क्रेडिट कार्डद्वारे छुपे शुल्क आकारणार नाही
इंडसंड बँकेसोबतची पार्टशनरशिप आमच्यासाठी गेमचेंजर ठरेल. सर्वोत्तम आर्थिक सेवांच्या शोधणाऱ्या असणाऱ्या ग्राहकांना आम्ही चांगल्या सुविधा पुरवू. ग्राहकांना कोणत्याही पद्धतीचे छुपे चार्ज आकारणार नाही. आमचे सध्याचे ग्राहक आणि भविष्यात आमच्याशी जोडणाऱ्या ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पुनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक अभय भुतडा यांनी म्हटले.
को-ब्रँडेड कार्डची वाढती मागणी
देशात आघाडीचे शॉपिंग, इ-कॉमर्स ब्रँड्स आणि बँकांनी मिळून को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणण्याचा सपाटा लावला आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, स्वीगी, झोमॅटो, विमान कंपन्या, गॅझेट निर्मिती कंपन्यांनी मिळून को-ब्रँडेड कार्ड आणले आहेत. या कार्डद्वारे ग्राहकांना जास्त ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जातात.
क्रेडिट कार्डचा वापर वाढला
क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याचे मागील दिसून येत आहे. देशातील एकूण क्रेडिट कार्डची आउटस्टँडिंग रक्कम 1.94 लाख कोटींवर पोहचली आहे. मागील आर्थिक वर्षात या कर्जाऊ रकमेचे प्रमाण 31 टक्क्यांनी वाढले. या सोबतच पेमेंट डिफॉल्ट होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अनेक जण क्रेडिट कार्ड ट्रपमध्ये अडकतात. त्यामुळे जबाबदारीने क्रेडिट कार्डचा वापर करणे गरजेचे आहे.