गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्ड युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. बँक खातेदारांना बँका देखील क्रेडीट कार्ड घेण्यासाठी तगादा लावताना दिसतात. कारण क्रेडीट कार्डच्या माध्यमातून बँकांची चांगली कमाई होत असते. लोकांचा देखील क्रेडीट कार्डचा वाढता वापर त्यांच्या कर्जात देखील वाढ करताना दिसत आहेत. याचाच परिणाम म्हणजे देशातील क्रेडीट कार्ड धारकांची क्रेडिट कार्डची थकबाकी पहिल्यांदाच 2 लाख कोटींच्या पुढे गेली आहे! होय स्वतः रिझर्व बँक ऑफ इंडियाने एका अहवालात हे जाहीर केले आहे.
क्रेडिट कार्डवर खातेदारांनी घेतलेले कर्ज गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढले असल्याचे हा अहवालात म्हटले आहे. तसेच क्रेडिट कार्डची थकबाकी गेल्या एका वर्षात बँकेच्या कर्जापेक्षा दुप्पट झाली आहे असे देखील अहवालात निरीक्षण नोंदवले गेले आहे. म्हणजेच बँकांकडून कर्ज घेण्यापेक्षा क्रेडीट कार्डचा वापर करून पैसे खर्च करण्यावर नागरीकांचा भर अधिक असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे भारतातील 5 टक्क्याहून कमी लोकांकडेच क्रेडीट कार्ड आहे!
महागाई हे मुख्य कारण!
भारतीय नागरिक बचतीला अधिक प्राधान्य देत असतात. कर्ज घेऊन मजा-मस्ती करणे ही भारतीय नागरिकांची सवय नाही असे मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने क्रेडीट कार्ड धारकांच्या संख्येत आणि कर्जात होत असलेली वाढ चिंताजनक असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
Credit card dues breached Rs 2 lakh cr
— NebulaWorld (@nebula_world) June 26, 2023
According to RBI data, credit card dues crossed the Rs.2 lakh cr mark in April 2023 a clear 30% rise compared to April 2022
What could have led to this rise? #ccgeek pic.twitter.com/Lyah7iFycQ
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, एप्रिल 2023 मध्ये देशभरातील एकूण क्रेडिट कार्डची थकबाकी 2,00,258 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एप्रिल 2022 च्या तुलनेत ही वाढ 7 टक्क्यांनी अधिक आहे. क्रेडिट कार्डवरील थकबाकी वाढण्यामागे पैशांची कमतरता आणि वाढती महागाई हे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. वाढत्या महागाईमुळे नागरिकांच्या हातात पैसा खेळता राहत नाहीये, त्यामुळे त्यांची खरेदी क्षमता देखील घटली आहे. अशावेळी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने युवा अवर्ग क्रेडीट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे.
अनावश्यक खर्च टाळता यायला हवा!
आपल्या आवश्यक गरजा आणि इच्छा खरे तर आपल्याला ओळखता यायला हव्या. आर्थिक शिस्त जर आपल्या अंगी नसेल तर वायफळ खर्च होणारच आहे, तेव्हा वेळीच असा वायफळ खर्च टाळता यायला हवा. बँका क्रेडीट कार्ड देताना म्हणजे त्यावर शुल्क आकारात नाहीत असे नाही. वेगवगेळ्या कारणासाठी क्रेडीट कार्डावर वेगवेगळे शुल्क आकारले जातात. क्रेडीट कार्ड देणाऱ्या बँकांची पॉलिसी लक्षात ठेवूनच खर्चासंबंधी निर्णय घ्यायला हवा.
गृहकर्जासाठी क्रेडीट कार्डचा वापर अधिक
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार गृहकर्जासाठी क्रेडीट कार्डचा वापर 14.1% इतका होत असल्याचे नोंदवले गेले आहे. त्या खालोखाल वाहन कर्जासाठी 3.7 टक्के आणि वैयक्तिक कर्जासाठी 1.4 टक्के क्रेडिट कार्डचा उपयोग केला जात आहे.