Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Myntra Kotak Credit Card: शॉपिंगवर डिस्काउंट आणि ऑफर्स मिळतील; मिंत्रा कोटक क्रेडिट कार्डबद्दल जाणून घ्या

Myntra Kotak Credit Card

Image Source : www.kotak.com

मिंत्रा आणि कोटक महिंद्रा बँकेने खास क्रेडिट कार्ड आणले आहे. या कार्डवरुन शॉपिंग करताना डिस्काउंट आणि एक्सक्लूजिव्ह ऑफर्स मिळतील. तसेच मिंत्रा इनसाइडर प्रोग्राममध्ये सहभागी होता येईल. स्वीगी फूड, स्वीगी इन्स्टामार्ट, क्लिअर ट्रिप, अर्बन कंपनीसारख्या साइटवरही डिस्काउंट मिळेल.

Myntra Kotak Credit Card: कोटक महिंद्रा बँकेने मिंत्रा ऑनलाइन शॉपिंगसोबत मिळून को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणले आहे. या कार्डद्वारे जर तुम्ही शॉपिंग करत असाल तर तुम्हाला इन्स्टंट डिस्काउंट आणि रिवॉर्ड पॉइंट मिळतील. तसेच इतर पार्टनर साइट जसे की, स्वीगी फूड, इन्स्टामार्टवरून शॉपिंग आणि फूड ऑर्डर करतानाही ऑफर मिळतील. 

मिंत्रा शॉपिंगवर मिळेल ऑफर

मिंत्रा कोटक बँक कार्डद्वारे शॉपिंग करत असाल तर प्रत्येक खरेदीवर 7.5% टक्के डिस्काउंट मिळेल. एकावेळी जास्ती जास्त 750 रुपये डिस्काउंट मिळेल. पार्टनर साइटवरून खरेदी केल्यास प्रत्येक वेळी 5% डिस्काउंट मिळेल. 

1 हजार रुपयांचे इ-व्हॉऊचर मिळेल.

मिंत्रा इनसाइडर मेंबरशीप अॅक्सेस मिळेल. याद्वारे मिंत्रा एक्सक्लूजिव ऑफर, खरेदीवर सुपर कॉइन आणि डिस्काउंट मिळेल. हे क्रेडिट कार्ड 1 तासात इश्यू केले जाऊ शकते. 

दर तीन महिन्यातून एकदा देशांतर्गत विमानतळावर एकदा लाऊंज अॅक्सेस मिळेल. 

पार्टनर ऑफर्स

या क्रेडिट कार्डवरून तुम्ही बँकेच्या पार्टनर साइट्सवरून खरेदी केली तर 5% डिस्काउंट मिळेल. प्रत्येक महिन्यात जास्तीत जास्त 1 हजार रुपये पार्टनर साइटवरून डिस्काउंट मिळेल. स्वीगी फूड, स्वीगी इन्स्टामार्ट, पीव्हीआर, क्लिअर ट्रिप, अर्बन कंपनीवरून पेमेंट करताना तसेच खरेदी करताना 5% डिस्काउंट मिळेल. 

मिंत्रा इनसाइडर प्रोग्रामचे फायदे काय?

जर तुम्ही मिंत्रा-कोटक क्रेडिट कार्ड घेतले तर याद्वारे तुम्हाला मिंत्रा इनसाइडर प्रोग्रामचे फायदे मिळतील.

कार्ड इश्यू झाल्यानंतर 7 दिवसानंतर या ऑफरचे फायदे मिळतील. वर्षाला कमीत कमी 7 हजार रुपयांचीशॉपिंग मिंत्रा साइटवरून करावी लागेल तसेच किमान 5 ऑनलाइन ऑर्डर कराव्या लागतील. 

फ्री शिपिंग, एक्सक्लूजिव सेल्स आणि डिस्काउंट ऑफर्स, सुपरकॉइन जिंकण्याची संधी मिळेल. 

माइलस्टोन प्रोग्राम 

दर तीन महिन्यात 50 हजार रुपये क्रेडिट कार्डद्वारे खर्च केल्यास पीव्हीआर सिनेमाचे 2 तिकिटे मिळतील. घरभाडे, वॉलेट रिचार्ज आणि इंधन भरण्यासाठीचे व्यवहार ग्राह्य धरले जाणार नाहीत. या व्यतिरिक्त गोष्टींवर 50 हजार रुपये तीन महिन्यात खर्च झालेले असावेत. या कार्डद्वारे तुम्हाला कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येईल.  18 ते 60 वयोगटातील व्यक्तींना हे कार्ड मिळू शकते. 

क्रेडिट कार्डसाठी शुल्क किती?

एकवेळ जॉइनिंग शुल्क 500 रुपये आणि वार्षिक शुल्क 500 रुपये आहे. वर्षभरात 2 लाख रुपये क्रेडिट कार्डद्वारे खर्च केल्यास पुढील वर्षाचे वार्षिक शुल्क माफ होईल. ही ऑफर फक्त पहिल्या वर्षासाठी आहे. जर यासोबत अॅड ऑन कार्ड खरेदी करत असाल तर 299 रुपये शुल्क लागेल.