Poco X5 Pro भारतात जानेवारी 2023 च्या अखेरीस सादर केला जाईल. फोनचे फीचर्स Redmi Note 12 Speed Edition सारखे असतील. Redmi Note 12 स्पीड एडिशन अलीकडेच चीनमध्ये 1 हजार 699 चीनी युआन म्हणजेच सुमारे 20 हजार 200 रुपये किंमतीत सादर करण्यात आले आहे.
Poco चा नवीन फोन Poco X5 Pro भारतात येण्यासाठी तयार आहे. कंपनीने हे सांगितल नसल तरी लिक झालेल्या महितीतून हे पुढे आले आहे. असे सांगितले जात आहे की, Poco X5 Pro या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सादर केला जाईल. Poco X5 Pro ही अलीकडेच लाँच झालेल्या Redmi Note 12 स्पीड एडिशनची री-ब्रँडेड आवृत्ती असू शकते. Poco X5 Pro मध्ये 12 GB RAM आणि Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.
Poco X5 Pro भारतात जानेवारी 2023 च्या अखेरीस लॉन्च होईल, असे सांगण्यात येत आहे. फोनचे फीचर्स Redmi Note 12 Speed Edition सारखे असतील. Redmi Note 12 स्पीड एडिशन अलीकडेच चीनमध्ये 1,699 चीनी युआन म्हणजेच सुमारे 20,200 रुपये किंमतीत सादर करण्यात आले आहे. ही किंमत 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटची आहे.
Redmi Note 12 Pro स्पीड एडिशनचे स्पेसिफिकेशन
या फोनमध्ये Android 12 सह MIUI 14 आहे. याशिवाय, फोनमध्ये 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये 6nm स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह 12 GB रॅम आहे.
Redmi Note 12 Pro स्पीड एडिशनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 100-मेगापिक्सेल Samsung HM2 सेन्सर आहे. दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलची आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सल्सची आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे.