Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMC: पुणे मनपाची खास लॉटरी; 'या' तारखेआधी मिळकत कर भरणाऱ्यांना कार, लॅपटॉप, दुचाकी जिंकण्याची संधी!

PMC Property Tax

पुणे महानगरपालिकने मिळकत कर वेळेवर भरणाऱ्या नागरिकांसाठी खास लॉटरी योजना आणली आहे. 15 मे ते 31 जुलैच्या आत जे नागरिक संपूर्ण मिळकत कर भरतील त्यांना आकर्षक बक्षीस जिंकता येणार आहे. 5 कार, 15 मोबाइल, 15 ई-बाइक आणि 10 लॅपटॉप बक्षिसाच्या स्वरुपात देण्यात येतील.

पुणे महानगरपालिकने मिळकत कर वेळेवर भरणाऱ्या नागरिकांसाठी खास लॉटरी योजना आणली आहे. 15 मे ते 31 जुलै च्या आत जे नागरिक मिळकत कर भरतील त्यांना आकर्षक बक्षीस जिंकता येईल. (PMC property tax lottery) निवासी, बिगर निवासी मालमत्ता, ओपन प्लॉट यावरील संपूर्ण मिळकत कर 31 जुलैच्या आत भरणाऱ्याचे आवाहन पालिकेने केले आहे. यासाठी कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. वेळेत मिळतकर भरणारे नागरिक या लॉटरीसाठी पात्र असतील. 

अनेक नागरिक प्रॉपर्टी टॅक्स वेळेत भरत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात घट होते. नागरिकांनी वेळेत कर भरावा यासाठी ही योजना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आणली आहे. मिळत कराच्या रकमेनुसार बक्षीस ठरवण्यात आले आहे. 31 जुलै च्या आत कर भरणाऱ्या नागरिकांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. 

वेळवर कर भरणाऱ्यांना सूट 

जे नागरिक वेळेवर मिळकत कर भरतील त्यांना 5 किंवा 10% करावर सूट मिळेल, अशी माहिती पालिकेने दिली आहे. (PMC property tax lottery) नागरिक घरबसल्या ऑनलाइनही पालिकेच्या संकेतस्थळावरुन कर भरणा करू शकतात. वेळेत कर भरून पैशांची बचत करा, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे. 

लॉटरीचे स्वरूप 

वार्षिक कर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्यांसाठी बक्षीस

1 पेट्रोल कार, 3 इलेक्ट्रिक बाईक, 3 मोबाइल फोन आणि दोन लॅपटॉप बक्षीस स्वरुपात दिले जातील.

वार्षिक कर 1 लाख ते 50 हजार असणाऱ्यांसाठी बक्षीस 

1 पेट्रोल कार, 3 इलेक्ट्रिक बाईक, 3 मोबाइल फोन आणि 2 लॅपटॉप 

वार्षिक कर 25 हजार किंवा त्यापेक्षा कमी असणाऱ्या नागरिकांसाठी

2 पेट्रोल कार, 6 इलेक्ट्रिक बाईक, 6 मोबाइल फोन आणि 4 लॅपटॉप बक्षीस म्हणून दिले जातील.

मिळकत कराची रक्कम कशी तपासाल?

PMC च्या संकेतस्थळावर तुम्हाला जावे लागेल.
मुख्य पेजवर Tax Bill हा पर्याय तुम्हाला दिसेल.
मालमत्तेचा प्रकार, खाते क्रमांक, सेक्शन आयडी अशी माहिती भरल्यास तुम्हाला बिलाची रक्कम दिसेल. 
PMC च्या संकेतस्थळावर तुम्ही टॅक्स कॅलक्युलेटही करू शकता.

pune-property-tax.jpg

मिळकत कर ऑनलाइन कसा भराल?

ऑनलाइन मिळकत कर भरण्यासाठी PMC च्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगइन करा. मुख्य पानावर तुम्हाला सर्व्हिसेस हा टॅब दिसेल. (PMC property tax lottery) या टॅबवर क्लिक केल्यानंतर 'मालमत्ता कर' असा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आवश्यक डिटेल्स भराव्या लागतील. त्यानंतर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता. पालिकेच्या कार्यालयात जाऊन तुम्ही थेट करभरणाही करू शकता.