लेखनाच्या जगात पाऊल ठेवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी पीएम युवा 2.0 योजना (PM Yuva 2.0 Scheme) चालवली जात आहे. याअंतर्गत तरुण लेखकांना विविध विषयांवर लेखन करण्याची संधी देण्यासाठी मार्गदर्शन योजना राबविली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या तरुण लेखकांना शिष्यवृत्ती म्हणून दरमहा 50 हजार रुपये दिले जातील. 30 वर्षांपर्यंतचे तरुण या योजनेत सहभागी होऊ शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 15 जानेवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
Table of contents [Show]
भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये तरुण आणि नवोदित लेखकांच्या मोठ्या प्रमाणावर सहभागासह पीएम युवा योजनेच्या पहिल्या आवृत्तीचा महत्त्वपूर्ण प्रभाव लक्षात घेता, आता युवा 2.0 साठी तरुणांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देण्यासाठी 30 वर्षांपर्यंतच्या तरुण आणि नवोदित लेखकांना प्रशिक्षण देण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
75 लेखकांना दरमहा 50,000 मिळणार
नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियातर्फे (National Book Trust of India) अखिल भारतीय स्पर्धेद्वारे एकूण 75 लेखकांची निवड केली जाईल. मेंटॉरशिप योजनेअंतर्गत, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या शेवटी, प्रत्येक निवडलेल्या तरुण लेखकाला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी 50,000 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती म्हणून एकूण 3 लाख रुपये दिले जातील.
22 भाषांसाठी अर्ज करू शकतात
भारतीय राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध 22 भाषांमधील तरुण लेखक पीएम युवा 2.0 योजनेत सहभागी होऊ शकतात. यामध्ये इंग्रजी, हिंदी, उर्दू, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी या भाषांचा समावेश आहे.
असा करा अर्ज
इच्छुक तरुण लेखकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. तरुण अर्जदार अधिकृत वेबसाइट https://innovateindia.mygov.in/yuva/ ला भेट देऊन आणि तळाशी डावीकडे 'क्लिक हिअर टू सबमिट' वर क्लिक करून अर्ज करू शकतात. पीएम युवा 2.0 योजनेची संपूर्ण माहिती वेबसाइटवरच देण्यात आली आहे.