आज एका विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होतकरू युवकांना रोजगाराचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. देशभरातील युवा वर्गाचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून रोजगार मेळाव्यात सरकारी क्षेत्रात 10 लाख युवकांच्या आणी युवतींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 51 हजारांहून अधिक उमेदवारांना आज नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. (Rojgar Mela 2023)
देशभरात 45 ठिकाणी हा रोजगार मेळा आयोजित केला गेला होता. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे रोजगारप्राप्त उमेदवारांना मार्गदर्शन केले आणि भारताच्या भविष्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याचा मूलमंत्र दिला. ही नियुक्तीपत्रे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली गेली.
व्होकल फॉर वोकल…
मोबाईल क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकावर असून जगभरात भारतात उत्पादित केलेले मोबाईल निर्यात केले जात आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असून येणाऱ्या काळात करोडो युवकांना रोजगाराचा फायदा मिळेल असे प्रधानमंत्री म्हणाले.
सध्या भारत सरकार ‘मेड इन इंडिया’ पीसी, टॅब्लेट आणि लॅपटॉप निर्मितीवर लक्ष केंद्रित करत असून त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून यात येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचे ते म्हणाले.
कुठल्या क्षेत्रात रोजगार?
पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार 51 हजार युवकांना विविध विभागांमध्ये नोकरीसाठी नियुक्ती पत्र दिले गेले आहे. यात केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो तिबेटीयन बॉर्डर यासारखे विविध सशस्त्र पोलीस दल. पोलीस (ITBP), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) तसेच दिल्ली पोलीस या गृह मंत्रालयाच्या आखत्यारीत विभागांमध्ये रोजगार दिला गेला आहे.इतर क्षेत्रातील रोजगार नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम लवकरच आयोजित केला जाणार आहे.
पारदर्शी नियुक्ती!
रोजगार मेळाव्यात केल्या गेलेल्या नियुक्ती या पारदर्शी पद्धतीने होत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. सर्व नियुक्त्या यूपीएससी, एसएससी, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आणि आयबीपीएस यांसारख्या एजन्सीमार्फत गुणवत्तापूर्ण युवकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.