देशभरातील करोडो शेतकऱ्यांना ज्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ची प्रतीक्षा होती, ती आज अखेर पूर्ण होणार आहे. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पीएम-किसान योजनेअंतर्गत सुमारे 8.5 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 14 वा हप्ता म्हणून सुमारे 17,000 कोटी रुपये जारी करणार आहेत. बहुतांश भागात शेतीची कामे सुरु झाली असून, या निधीमुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे.
राजस्थान येथे कार्यक्रमाचे आयोजन!
पीएम किसान सन्मान निधीचा चौदावा हफ्ता शेतकऱ्यांना आज एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमधील सीकर येथे एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना हे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते निधीचे वाटप केले जाईल आणि देशभरातील शेतकऱ्यांना ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आज राजस्थान से 8.5 करोड़ 'पीएम-किसान सम्मान निधि' के लाभार्थी किसानों के बैंक खातों में 14वीं किस्त का हस्तांतरण करेंगे।@narendramodi @nstomar #PMKisan #PMKisan14thInstallment pic.twitter.com/nx9Qt7Gf8O
— Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) July 27, 2023
या निधीचा उपयोग शेतकरी त्यांच्या दैनंदिन गरजा अपूर्ण करण्यासाठी वापरू शकणार आहे. केवळ शेतीसंबंधी कामांसाठी हा निधी दिला जात नाही, शेतकरी त्यांच्या इतर गरजा अपूर्ण करण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात.
2019 पासून योजना सुरु…
PM Kisan Samman Nidhi ही योजना केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी जाहीर केली होती. तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांना 14 हफ्त्यांची मदत दिली गेली आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे देशभरातील शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये प्रति वर्ष 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच 2000 रुपये हफ्त्याप्रमाणे दिले जातात.
प्रधानमंत्री कार्यालयाने जरी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1.25 लाख पीएम किसान समृद्धी केंद्रांचे (PMKSK) लोकार्पण करतील.