Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PhonePe Plan to Buy ZestMoney : फोन-पेचा डिजिटल लोन स्कीममध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न!

PhonePe Plan to Buy ZestMoney

PhonePe Zestmoney Deal : ZestMoney ग्राहकांना खरेदी आता करा पेमेंट नंतर करा (Buy Now Pay Later) ही सुविधा पुरवते. तसेच ग्राहकाला अगदी माफक दरात ईएमआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा ZestMoney उपलब्ध करून देते.

डिजिटल पेमेंट्स आणि फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या PhonePe ने आता कर्ज देण्याच्या व्यवसायात पूर्ण क्षमतेने उतरण्यासाठी Buy Now Pay Later ही सुविधा देणाऱ्या ZestMoney ही प्लॅटफॉर्म विकत (PhonePe Zestmoney Deal) घेण्याची तयारी सुरू केली. कंपनी भविष्यात युपीआय (Unifies Payments Interface-UPI)द्वारे मेगा फंडरेज प्लॅन्समध्ये उतरण्यापूर्वी डिजिटल लोन स्कीममध्ये पाऊल टाकण्याचा विचार करत आहे.

काय आहे ‘बाय नाऊ पे लेटर’ (BNPL) सुविधा!

कोणत्याही खरेदी व्यवहारात  आपण पैसे देतो आणि वस्तू खरेदी करतो. तेव्हा ती वस्तू आपल्या मालकीची होते व आपण ती आपल्या घरी नेतो. मात्र, ‘बाय नाऊ पे लेटर’  (Buy Now Pay Later) मध्ये ‘खरेदी आता आणि पैसे नंतर’ दिले जातात. यात ठराविक विक्रेत्याकडून ग्राहक तात्काळ वस्तू खरेदी करू शकतो; त्याला पैसे मात्र नंतर देता येतात. ठराविक मुदतीत हप्त्याने पैसे भरून ‘बाय नाऊ पे लेटर’ने व्याजमुक्त खरेदी करता येते.

तर ZestMoney कर्ज देणाऱ्या कंपनीकडून रक्कम घेऊन ती थेट वस्तू विकणाऱ्या कंपनीला देते. यादरम्यान कंपनी ग्राहकाकडून सर्व गोष्टींची पूर्तता करून त्याला खरेदी आता आणि पैसे नंतर ही सुविधा पुरवते.

प्रतिस्पर्धी कंपन्या लोन डिस्ट्रिब्युशनमुळे नफ्यात!

PhonePe ने यापूर्वी म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशन, इन्शुरन्स, डिजिटल सोने-चांदीची विक्री आदी क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे. पण कंपनीने अजून ग्राहकाना कर्ज देण्याची सिस्टिम सुरू केलेली नाही. PhonePe चे कॉम्पिटीटर Paytm आणि BharatPe हे दोन्ही प्लॅटफॉर्म लोन देण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. पेटीएमने ऑक्टोबर महिन्यात जाहीर केले होते की, लोन डिस्ट्रिब्युशनमुळे कंपनीच्या नफ्यात पाचपट वाढ होऊन कंपनीला 3,056 कोटी रुपयांचा फायदा झाला.

ZEST MONEY IN NUMBER

ZestMoneyची मालकी कोणाकडे आहे?

लिझी चॅपमन, प्रिया शर्मा आणि आशिष अनंतरामन यांनी 2016 मध्ये ZestMoney स्थापना केली होती. याचे एकूण 17 दशलक्ष ग्राहक असून कंपनी प्रत्येक महिन्याला 400 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करते. कंपनीसोबत कर्ज देणारे 27 पार्टनर आणि 10 हजार ऑनलाईन ब्रॅण्ड कंपन्या आणि 75 हजार ऑफलाईन स्टोअर्स पार्टनर जोडलेले आहेत. 

ZestMoneyच्या तोट्यात वाढ!

ZestMoney चा तोटा 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात तिपटीने वाढून 398.8 कोटी झाला. जो मागील आर्थिक वर्षात 125.8 कोटी रुपये होता. कंपनीच्या एकूण महसुलात 62 टक्क्यांनी वाढ झाली असून 2022 मधील नफा 145 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी 89.3 कोटी रुपये होता.