Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'फोन-पे'ची 100 रुपयांपासून सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी

सोन्यात गुंतवणूक

'फोन-पे'च्या (PhonePe) UPI माध्यमातून एसआयपीमध्ये (SIP) 100 रुपयांपासून करता येणार सोन्यात गुंतवणूक.

प्रसिद्ध ऑनलाइन वॉलेट आणि पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फोन-पे (PhonePe) ने एक नवीन सर्व्हिस सुरू केली आहे. ज्याद्वारे फोन-पे चे (PhonePe) वापरकर्ते  युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा लाभ घेऊन सोन्याच्या गुंतवणुकीसाठी एसआयपी (SIP) करू शकतील. फोन-पे (PhonePe) ने म्हटले आहे की, वापरकर्ते फक्त 100 रुपये प्रति महिना गुंतवून एसआयपी(SIP) सुरु करू शकतात. गुंतवणूक केलेलं सोनं हे 24 कॅरेटचं शुद्ध सोनं असणार आहे. ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे आणि दीर्घ मुदतीत जास्त परतावा मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तसेच वापरकर्त्यांनी गुंतववलेलं सोनं MMTC-PAMP आणि  SafeGold  यांच्या देखरेखीखाली सुरक्षित असेल, असे फोन-पे (PhonePe) ने जाहीर केले आहे.

एसआयपीवर (SIP) वापरकर्त्याचे नियंत्रण

फोन-पे (PhonePe)ने सांगितले की, वापरकर्त्याचे एसआयपीवर (SIP) पूर्ण नियंत्रण असेल आणि ते त्यांना हवे तेव्हा सोनं विकू शकतील. विकलेले सोन्याचे पैसे थेट वापरकर्त्याच्या बँक खात्यात जमा केले जातील. तसेच सोनं हवे असल्यास सोन्याचे नाणे किंवा बार घरपोच पाठवले जाणार आहे. फोन-पे (PhonePe) ने सोन्यात SIP द्वारे गुंतवणूक करण्यासाठी, युजरला प्रथम गोल्ड प्रोव्हायडर निवडावा लागेल. त्यांना कोणत्या मासिक रकमेसह जायचे आहे, ते नमूद करावे लागेल आणि नंतर त्यांचा UPI पिन टाकून व्यवहाराची प्रक्रिया किंवा प्रमाणीकरण करावे लागेल.

UPI SIP कसे सुरू करावे

  •  PhonePe अ‍ॅपच्या शेवटी असलेल्या 'वेल्थ' टॅबवर जा. 
  • इन्वेस्टमेंट आयडिया सेक्शनमध्ये सोनं वर टॅप करा. 
  • Accumulating Gold/Buy More Gold  हा पर्याय निवडा.
  • Provider निवडा.
  • गुंतवणुकीच्या तारखेसह तुम्हाला मासिक गुंतवणूक करायची असलेली रक्कम टाका. 
  • 'पे' निवडा आणि 'ऑटो पे' सेट करा.
  • UPI पिनने पडताळणी करा

दिवसेंदिवस महाग होणाऱ्या सोन्यात गुंतवणुकीसाठी फोनपेने आणलेला हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.