देशातील सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याच्या प्रयत्नात तेल कंपन्यांनी गुरुवारी इंधनाचे दर कायम ठेवले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट होत असतानाही भारतीय तेल विपणन संस्थांनी 16 फेब्रुवारी 2023 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमती जाहीर केल्या आहेत. महागाईच्या काळात (Inflation) पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate) स्थिर असतानाच, प्रत्येक वस्तूचे दर वाढत असताना गुरुवारी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Table of contents [Show]
पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (OMCs) जसे की भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) जागतिक बेंचमार्क किमतींनुसार त्यांची किंमत दररोज जारी करतात. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 78 डॉलरपर्यंत घसरले आहे, तर ब्रेंट क्रूड आता प्रति बॅरल 85 डॉलरवर आहे. गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये, कोलकाता 106.03 रुपये, नवी दिल्ली 96.72 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये प्रति लिटर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव
गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 85.61 डॉलर आणि ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 91.63 डॉलरच्या जवळ आली आहे. यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपये प्रति लिटर स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.
देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर विकला जात आहे. त्याचवेळी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. त्याचवेळी चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
महाराष्ट्रात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : पेट्रोल 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर