Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Inflation rate : महागाई निर्देशांकातील घटीचे व्याजदर वाढ हे कारण नाही, जाणून घ्या आरबीआयचे वर्मा अस का म्हणाले ?

Inflation rate

Inflation rate : नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई निर्देशांक 11 महिन्यांच्या नीचांकावर (5.88 टक्के) नोंदवण्यात आला. मात्र व्याज दरवाढ निर्णयला याचे फारसे श्रेय देता येणार नाही, असे मत प्रा. जयंत आर. वर्मा यांनी व्यक्त केले आहे. ते अस का म्हणणाले ते जाणून घेऊया .

नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई निर्देशांक 11  महिन्यांच्या नीचांकावर (5.88 टक्के) नोंदवण्यात  आला. मात्र व्याज दरवाढ निर्णयला  याचे फारसे श्रेय देता येणार नाही, असे मत प्रा. जयंत आर. वर्मा यांनी व्यक्त केले आहे. ते अस का म्हणणाले ते जाणून घेऊया . 

घाऊक महागाई निर्देशांक 11  महिन्यांच्या नीचांकावर नोंदवण्यात आला.  याचे व्याज दरवाढीला याचे फारसे श्रेय देता येणार नाही, असे मत रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीचे एक सदस्य असणणारे प्रा. जयंत आर. वर्मा यांनी व्यक्त केले आहे.  पतधोरण हे तीन ते पाच तिमाहींनी मागे असते. त्यामुळे आताच्या या दरवाढीचा परिणाम 2023 च्या मध्यावर दिसू शकेल, अस ते म्हणाले आहेत. 

RBI ने रेपो दरात केली 0.35 टक्क्यांची वाढ 

रिझव्‍‌र्ह बँकेने 7  डिसेंबर रोजी रेपो दरामध्ये वाढ केली होती. 0.35 टक्क्यांची ही वाढ होती.  हा निर्णय सहा सदस्यीय पतधोरण आढावा समिती बैठकीत झाला होता.  पाच विरुद्ध एक अशा मतफरकाने हा निर्णय झाला होता. वर्मा यांनी यावेळी  दरवाढीला विरोध केला होता. सलग तीन तिमाहींमध्ये महागाई दर 6 टक्क्यांच्या वर असल्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारला पत्र लिहिण्यात आले होते.

व्याज दरवाढीमुळे महागाई आटोक्यात आणण्यास मदत झाली आहे का, असे  वर्मा यांना विचारण्यात आले.  यावर प्रा. वर्मा म्हणाले, ‘‘महागाईवर परिणाम करण्यास पतधोरणाला जवळजवळ एक वर्षांचा कालावधी लागतो. सर्वप्रथम वाढलेले व्याजदर हे बँकांमधील ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांमध्ये परावर्तीत व्हावे लागतात. त्यानंतर व्याजदरांचा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्यास आणखी काही काळ जावा लागतो. एप्रिल-मे महिन्यात झालेल्या पहिल्या दरवाढीचा थोडा परिणाम आता दिसायला लागला आहे. त्यामुळे अलिकडच्या महिन्यांमध्ये घटलेल्या महागाईचे श्रेय पतधोरणाला देता येईल, असे मला वाटत नाही.’’ पतधोरण आढावा समितीमधील मतभेदांबाबतही त्यानी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘समितीमध्ये भिन्न मते असणे हे चांगले लक्षण आहे. त्यामुळे आतासारख्या नाजूक काळामध्ये क्लिष्ट विषयांचे विश्लेषण आणि त्यावर साधकबाधक चर्चा होते.’’

जागतिक मंदीवर केले भाष्य (world recession)

जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीबाबत वेगवेगळी मत व्यक्त होत आहेत.  प्रा. वर्मा यांनीदेलखील याबबात आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी याविषयी सावधगिरीचा इशारा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेल्या धक्क्यांमागील कारणे जागतिक स्वरूपाची होती. करोना महासाथ, पुरवठा साखळीतील खंड, रशिया - युक्रेन युद्ध याचा प्रामुख्याने परिणाम झाला. भारतीय अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी खुली असल्यामुळे जागतिक मंदीचा धोका हा भारतासाठीही चिंतेचा विषय असल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले आहे.