Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paytm UPI Lite: पेटीएम बँकेकडून UPI Lite फिचर लाँच; PIN शिवाय करा ऑनलाइन व्यवहार

Paytm UPI Lite

UPI Lite द्वारे 200 रुपयांपर्यंतचे व्यवहार विना PIN टाकता करता येऊ शकतात. ही सुविधा ग्राहकांना देणारी पेटीएमही भारतातील पहिली फिनटेक कंपनी ठरली आहे. भारतामध्ये दरदिवशी होणाऱ्या एकूण ऑनलाइन व्यवहारांपैकी निम्मे व्यवहार 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे होतात.

Paytm UPI Lite: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी पेटीएमने (Paytm launch UPI lite) आनंदाची बातमी आणली आहे. पेटीएम बँकेने भारतात सर्वात प्रथम UPI Lite ही सुविधा सुरू केली आहे. पेमेंट अॅपवर ही सुविधा आता उपलब्ध झाली आहे. भारतामध्ये दररोज कोट्यवधी ऑनलाइन व्यवहार होतात. यातील निम्म्यापेक्षा जास्त व्यवहार कमी किंमतीचे असतात. अनेकजन दहा पाच रुपयांचेही ऑनलाइन युपीआयद्वारे व्यवहार करतात. मात्र, त्यासाठी आता PIN टाकण्याची गरज नाही.

UPI Lite द्वारे 200 रुपयांपर्यंतचे व्यवहार PIN न टाकताही करता येऊ शकतात. ही सुविधा ग्राहकांना देणारी पेटीएमही भारतातील पहिली फिनटेक कंपनी ठरली आहे. “ही सुविधा ग्राहकांना देताना आम्हाला आनंद होत आहे. NPCI च्या आकडेवारीनुसार दिवसभरातील एकूण ऑनलाइन पैशांच्या व्यवहारांपैकी निम्म्यापेक्षा जास्त व्यवहार 200 रुपयांपेक्षा कमी आहेत. आता UPI Lite द्वारे सुरक्षित मात्र, जलद ट्रान्झॅक्शन ग्राहकांना करता येणार आहेत”, असे पेटीएम पेमेंट बँकचे सीईओ सुरिंदर चावला यांनी म्हटले आहे.

फोनपे युपीआय लाइट (Phonepe UPI Lite)

वॉलमार्टच्या मालकीचे ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपे सुद्धा UPI Lite फिचर लवकरच लाँच करणार आहे. सोबतच इतरही काही ऑनलाइन पेमेंट अॅप लाइट फिचर लवकरच आणणार आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये सर्वप्रथम UPI Lite फिचर लाँच करण्यात आले होते. सध्या फक्त सरकारी मालकीचे भीम पेमेंट अॅप लाइट फिचर्सची सुविधा देते. खूप कमी लोकांकडून या सुविधेचा वापर होतो. फोन पे, पेटीएम गुगल यांनी UPI Lite सुविधा सुरू केल्यानंतर त्याचा वापर वाढण्याची शक्यता आहे.

भारतामध्ये एकूण ऑनलाइन व्यवहारांपैकी 75% व्यवहार हे 100 रुपयांपैक्षा कमी आहेत. यामध्ये कॅशद्वारे होणाऱ्या व्यवहारांचाही समावेश  आहे. तर 50% व्यवहार हे 200 रुपयांपेक्षा कमी मुल्याचे आहेत. यासंबंधीची आकडेवारी National payment corporation ने मागील वर्षी मार्च महिन्यात जारी केली होती.

बँक पासबुकवर कमी किंमतीचे व्यवहार दिसणार नाहीत

UPI Lite मुळे कमी किंमतीचे व्यवहार पासबुकमध्ये घेतले जाणार नाहीत. ते फक्त अॅपमधील हिस्ट्रीमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे तुमचे पासबुकही लवकर भरणार नाही. UPI lite मुळे आता ऑनलाइन व्यवहारांची संख्या आणखी वाढणार आहे. गुगल पे , फोन पे अॅप्सद्वारे भारतात सर्वाधिक ऑनलाइन व्यवहार होतात. पेटीएमची मक्तेदारी या दोन्ही कंपन्यांनी मोडीत काढली आहे.