IMAX Format Movie: सध्या बाॅलिवुड चित्रपट थिएटरनंतर ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) मोठया प्रमाणात प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना चांगला प्रतिसाददेखील मिळतो. सध्या तर नवीन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची क्रेझच निर्माण झाली आहे. मात्र देशातील शाहरूख खान ((Shahrukh Khan)चा ‘पठाण’ (Pathan) हा पहिलाच चित्रपट आहे, जो ICE फॉरमॅटवर रिलिज झाला आहे. तुम्हाला माहिती का चित्रपट पाहण्यासाठी ICE फॉरमॅट व IMAX फॉरमॅट हा काय प्रकार आहे.
ICE फॉरमॅट म्हणजे काय?
ICE फॉरमॅटचा फुलफॉर्म हा ‘इमर्सिव्ह सिनेमा एक्सपिरियन्स’ (Immersive Cinema Experience) असा आहे. याचा अर्थ म्हणजे तुम्ही हा चित्रपट पाहण्याचा अधिक चांगला अनुभव घेवु शकता. जसे की, स्क्रीन व्यतिरिक्त तुमच्या ऑडिटोरियमच्या बाजूला फलक असतात, ज्यामुळे तुमचा फोकस फक्त स्क्रीनवरच असतो. जेणेकरून तुम्ही डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे तुम्ही चित्रपट पाहण्याचा अधिक चांगला अनुभव घेऊ शकता. या फॉरमॅटमुळे चित्रपटातील चित्राच्या दृश्यानुसार रंग व प्रकाशाचा प्रभाव बदलताना दिसतो. देशात ICE फॉरमॅट थिएटर हे फक्त दोनच ठिकाणी आहेत. एक गुरूग्राम याठिकाणी तर दुसरे दिल्ली येथील वसंत कुंज येथे आहेत.
IMAX फॉरमॅट म्हणजे काय
देशात बऱ्याच शहरात IMAX फॉरमॅट थिएटर आहेत. या फॉरमॅटमध्ये असलेले थिएटर हाय-रिझोल्यूशन कॅमेरे, फिल्म फॉरमॅट, प्रोजेक्टर आणि थिएटर व्ह्यूजचा मोठा अनुभव देतात. त्यामुळे चित्रपट पाहताना मजा येते. या फॉरमॅटमध्ये तुम्हाला 1.43:1 किंवा 1.90:1 च्या आस्पेक्ट रेशोमध्ये चित्रपट पाहता येतो. या थिएटरमधील खुर्चीदेखील IMAX फॉरमॅटमध्ये तयार करण्यात आली आहेत, जेणेकरून प्रेक्षक चित्रपटाचा आनंद मनसोक्त लुटू शकतात.