Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pathan Movie Collection: पठाण चित्रपटाचा पहिला शो हाऊसफुल्ल, पहिल्याच दिवशी अ‍ॅडव्हाॅन्स बुकिंग 23 कोटी

Pathan Movie Rating

Image Source : http://www.moneycontrol.com/

Shahrukh Khan Pathan Movie: शाहरूख खानचे चाहते, ज्या क्षणाची प्रतिक्षा करित होते, अखेर तो क्षण आला. आज 25 जानेवारी 2023 ला 'पठाण' (Pathan) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्याच शो ला प्रेक्षकांची तुफान गर्दी दिसली.

Pathan Movie Rating: शाहरूख खान (Shahrukh Khan) व दिपिका पदुकोन (Deepika Padukoun) चा ‘पठाण’ चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्याच शो ला प्रेक्षकांची झुंबड उडाली होती. हा प्रतिसाद पाहता, चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी पठाण चित्रपटाने किती कमविले हे पाहूयात. या चित्रपटाची देशभरात तुफान चर्चा आहे. एकीकडे बंद पडलेले थिएटर सुरू केले, तर दुसरीकडे चाहत्यांनी संपूर्ण थिएटरच बुक केले आहेत.

पठाणने अ‍ॅडव्हाॅन्स बुकिंग किती कमविले (How much did Pathan Earn from Advance Booking)

फायनली पठाण चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्याच शो ला प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाचे प्रेक्षक खूप कौतूक करताना दिसत आहे. या शो ने पहिल्याच दिवशी अ‍ॅडव्हाॅन्स बुकिंग व्दारे 23 कोटीचा गल्ला जमविला. तर दुसऱ्या दिवशी 13.3 कोटी, तिसऱ्या दिवशी 13.9 कोटीची कमाई केली आहे. पठाण चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 50 कोटींचा गल्ला बाॅक्सआॅफीसवर जमा केला आहे. हा चित्रपटाचा पहिलाच शो एकदम हाऊसफुल्ल झाला आहे.

पठाणला मिळाले साडे चार स्टार्स (Pathan Got Four and a Half Stars)

पठाण चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी थिएटरच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी केली आहे. प्रेक्षक शाहरूख खानच्या पठाण चित्रपटाचे कौतूक करताना दिसत आहे. फिल्म क्रिटिक ‘तरण आदर्श’ (Taran Adarsh) यांनी सोशलमिडीयाच्या पोस्टव्दारे या चित्रपटाला साडे चार स्टार दिले आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर असून या वर्षाचा हा पहिला सुपरहीट चित्रपट ठरणार आहे. यातील चित्रपटातील स्टार पावर, स्टाइल, स्केल, गाने, कंटेंट व सरप्राइजेस अफलातून आहे. शाहरुख खानने दमदार पुनरागमन केले असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.