Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pathan Movie Collection Day 10: पठाण भारतात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला, दहाव्या दिवशी ही केली तगडी कमाई

Pathan Movie Collection Day 10

Image Source : http://www.youtube.com/

Pathan Movie Collection: पठाण चित्रपट एकापाठोपाठ एक रेकाॅर्ड तोडत आहे. आता तर हा चित्रपट भारतात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने दहाव्या दिवशीदेखील तगडी कमाई केली असल्याचे दिसत आहे.

Sharukh Khan Pathan Movie: पठाण चित्रपट हा 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापासून ते आतापर्यंत हा चित्रपट प्रत्येक दिवशी कोटी रूपयांची कमाई करीत आहे. या चित्रपटाने संपूर्ण भारतासह जगातील प्रेक्षकांचेदेखील मन जिंकले आहे. पठाण भारतात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे.

दहाव्या दिवशी किती कमविले? (How much Earned on the Tenth Day)

 पठाण चित्रपट प्रदर्शनानंतर रोज काही ना काही रेकाॅर्ड तोडत आहे. या चित्रपटाने संपूर्ण जगासह भारतातील प्रेक्षकांच्या मनावरदेखील जादू केली आहे. हा चित्रपट प्रत्येक दिवशी करोडोंची कमाई करत आहेत. या चित्रपटाने प्रदर्शन नंतरच्या दहाव्या दिवशीदेखील बाॅक्स आॅफीसवर तब्बल 13 कोटी रूपयांची कमाई केली आहे. नवव्या दिवशी या चित्रपटाने भारतात 15 कोटी 50 लाख रूपयांची तगडी कमाई केली आहे. आतापर्यंत पठाण चित्रपटाने भारतात बाॅक्स आॅफीसवर 377 कोटी रूपये कमविले आहे.

भारतात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट (4th Highest Grossing Film in India)

पठाण हा चित्रपट भारतात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. बाहुबली 2, केजीएफ चॅप्टर 2 आणि दंगल या चित्रपटानंतर शाहरूख खानच्या पठाण चित्रपटाने भारतात सर्वाधिक कमाई केली असल्याचे चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी सांगितले.

जागतिक स्तरावर 'पठाण'चा डंका (Global Appreciation of 'Pathan')

पठाण हा चित्रपट रेकाॅर्डस करणे काय थांबत नाही. हा चित्रपट एकापाठोपाठ एक रेकाॅर्ड तोडत आहे. तसेच या चित्रपटाची चर्चा प्रदर्शन पूर्वीपासूनच प्रेक्षकांमध्ये होती. हा चित्रपट अनेक वादग्रस्त परिस्थितीतदेखील अडकला होता, मात्र त्याचा काही परिणाम बाॅक्स आॅफीस कलेक्शनवर झालेला दिसत नाही. जगभरात या चित्रपटाने 700 कोटी रूपयांची कमाई केल्याची माहिती देण्यात आली आहे.