Theater book for the movie Pathan: शाहरूख खान (Shah Rukh Khan) व दिपिका पदुकोन (Deepika Padukone)चा पठाण (Pathan) हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच परदेशासह भारतातदेखील थिएटर बुक होऊ लागली आहेत. सध्या हा चित्रपट बऱ्याच वादग्रस्त कारणांमध्ये अडकला असला, तरी या चित्रपटाची हवा मात्र एकदम टाइट असल्याचे सांगलीतील या चाहत्याने दाखवून दिले आहे.
Pathan Release Date: पठाण हा चित्रपट वादग्रस्त परिस्थितीत अडकलेला असला तरी प्रदर्शनापूर्वीच सुपरहीट असल्याचे दिसत आहे. कारण महाराष्ट्रात पठाण या चित्रपटाचे वेड लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. चक्क, सांगलीच्या (Sangli) या पठ्ठयाने या चित्रपटासाठी संपूर्ण थिएटरच बुक केले आहे. शिवाय त्याने शाहरूख खानला देखील सोशलमिडीयाव्दारे सांगितले आहे व विशेष म्हणजे किंग खानचा (King Khan) यावर रिप्लायदेखील आला आहे. चला, तर मग जाणून घेवुयात याबद्दल सविस्तर.
कोणी केले थिएटर बुक (Who booked the theater)
सांगली जिल्हयातील शाहरूख खानचा जबरा फॅन वसीम तांबोळी याने पठाण चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केले आहे. त्याने व त्याच्या मित्रांनी मिळून सकाळी 9.30 वाजता सुरू होणाऱ्या शो ची 111 तिकिटे बुक केली आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. वसीम व त्याचे काही मित्र सांगली जिल्हयात "एसआरके युनिव्हर्स क्लब" देखील चालवितात.
शाहरूख खानने मानले आभार (Shah Rukh Khan thanked)
वसीम तांबोळी हा "एसआरके युनिव्हर्स" ग्रुपचा सांगली जिल्हयाचा अॅडमिन आहे. तो शाहरूख खानचा खूप मोठा चाहता आहे. त्याने शो साठी बुक केलेल्या थिएटरबाबत ट्विटरवर पोस्ट केले आणि किंग खानलादेखील टॅग केले. यावर शाहरूखने रिप्लाय देत, त्याचे व त्याच्या सर्व मित्रांचे आभार मानले. तसेच हा चित्रपट नक्कीच तुम्हाला आवडेल आणि त्याचा आनंद घ्या,असे प्रतिउत्तरदेखील शाहरुखने ट्विटरवर दिले आहे.