Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Parag Agrawal Fired : ट्विटरमधून हकालपट्टीनंतर पराग अग्रवालांना मिळणार ‘एवढी’ रक्कम

Parag Agrawal Fired

Parag Agrawal Fired : एखाद्या व्यक्तीला कामावरून काढल्यास त्याला मिळणारी रक्कम बातमी बनेल असे यापूर्वी क्वचितच घडले असेल. ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (Parag Agrawal, Former CEO Twitter) यांची ट्विटरमधून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या रकमेची सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे.

टेस्लाचे मालक आणि अब्जाधिश इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) विकत घेताच त्यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (Parag Agrawal, CEO of Twitter) यांची हकालपट्टी केली. असे असले तरी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांना त्यांचे सर्व 100 टक्के गुंतवणूक पुरस्कार अवॉर्ड मिळणार असल्याची माहिती ब्लूमबर्गने दिली आहे. तर रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार इक्विलरने संशोधन केले असून पराग अग्रवाल (Parag Agrawal compensation) यांना मिळणारी एकूण रक्कम ही अंदाजे $42 दशलक्ष (42 Million Dollars) इतकी आहे. ट्विटरचे माजी सीईओ अग्रवाल यांना एकूण 30.4 दशलक्ष डॉलरची भरपाई मिळणं अपेक्षित आहे. तसेच पराग अग्रवाल यांना वर्षाला 1 मिलिअन डॉलर पगार मिळत होता. 

पराग अग्रवाल 2011 मध्ये ट्विटरमध्ये रुजू

पराग अग्रवाल 2011 मध्ये ट्विटरमध्ये रुजू झाले आणि ऑक्टोबर 2017 पासून त्यांनी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली, जिथे ते फर्मच्या तांत्रिक धोरणाचे प्रभारी होते. ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांचा पदभार सोडल्यानंतर पराग अग्रवाल यांनी त्यांचा पदभार स्वीकारला.

अग्रवालांसोबत काम करण्यास मस्क यांची नापसंती (Why Elon Musk fired Parag Agrawal)

टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk Sink) वेळोवेळी ट्विटरच्या व्यवस्थापनाबद्दल नापसंती व्यक्त केली होती, ज्यात अग्रवाल आणि विजय गड्डे यांचा समावेश होता. मस्कच्या काही लीक झालेल्या चॅट्समध्ये त्यांनी माजी ट्विटर सीईओ डोर्सी यांच्याशी चर्चा केली होती की ते आणि अग्रवाल एकत्र कसे काम करू शकत नाहीत.