अमेरिकेतील अब्जाधीश इलॉन मस्क (Elon Musk) याने ट्विटरचा करार पूर्ण केल्यानंतर लगेच ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (Parag Agrawal,CEO)आणि लीगल अधिकारी विजया गाड्डे (Vijaya Gadde, Legal Officer) आणि सीएफओ नीड सेगल याच्यासह काही अधिकाऱ्यांना 800 कोटी रुपयांची बिदागी देऊन बाहेरचा रस्ता दाखवला. पण मग आता इलॉन मस्क हा एवढा मोठा तोटा रिकव्हर कसा करणार? एकंदरीत ट्विटर पैसे कसे मिळवणार आणि मिळवतं हा प्रश्न उत्सुकता निर्माण करणारा आहे.
जगातील अब्जाधीश इलॉन मस्क याने ट्विटर खरेदी करण्यापूर्वी ट्विटरच्या विश्वासार्हतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यासाठी त्याने ट्विटरच्या संचालक मंडळावर अनेकवेळा तोंडसुखही घेतले होते. त्यानंतर त्याने ट्विटर विकत घेण्याची घोषणा केली आणि तसा 44 अब्ज डॉलरचा करार केला. करारानंतर ट्विटर संचालक मंडळ आणि इलॉन मस्क यांच्यात ट्विटरच्या पॉलिसीवरून हमरीतुमरी सुरू होती. ती अखेर संपली असून इलॉन मस्कने 44 अब्ज डॉलरला ट्विटर कंपनी विकत घेतली. कंपनीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर इलॉन मस्कने ‘Bird is Freed…’ म्हणजेच ‘पक्षी मुक्त झाला...’ अशी ट्विटरवर घोषणा करत ट्विटर कंपनी ताब्यात घेतली. ट्विटर कंपनीचा चार्ज स्वीकारल्यानंतर लगेचच मस्क याने ट्विटरचे तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल, लिगल ऑफिसर विजया गाड्डे, सिन एडगेट आणि ट्विटरचे सीएफओ नीड सेगल यांना घरचा रस्ता दाखवला. यांना फायर करताना ट्विटरने 100 मिलिअन डॉलर म्हणजेच 823 कोटी रूपयांचा भुर्दंड सहन केला. आता एवढी मोठी रक्कम ट्विटरला कंपनी म्हणून रिकव्हर करावी लागणारच आहे. यासाठी कंपनी योग्य ती पाऊले उचलेलच. पण मुळात प्रश्न असा निर्माण होतो की, ट्विटर पैसे कसे कमावते. ट्विटरचा Revenue Source काय आहे? ते पैसे कसे उभे करतात. तर आज आपण ट्विटरचा Revenue Source जाणून घेणार आहोत.
ट्विटर बिझनेस मॉडेल (Twitter Business Model)
एखाद्या कंपनीसाठी 800 कोटी रुपये खूप मोठी रक्कम आहे. अर्थात मोठमोठ्या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल हे ठरलेले असते. त्यामुळे हा तोटा रिकव्हर करणे हे मोठ्या कंपनीसाठी एक नियमित प्रोसेस असू शकते. त्याचप्रमाणे ट्विटरचे सुद्धा बिझनेस मॉडेल ठरलेले आहे. ट्विटरला 85 टक्के रिव्हेन्यू हा जाहिरातींमधूनच मिळतो. जसे की, प्रमोटेड अॅड्स (Promoted Ads), फॉलोव्हर्स अॅड्स (Followers Ads)तसेच ट्रेण्ड टेक ओव्हर (Trend Take Over) यामधून ट्विटरला महसूल (Revenue) मिळतो आणि उर्वरित 15 महसूल हा डेटा सेलिंग (Data Selling)मधून मिळतो. उदाहरणार्थ, एखाद्या एजन्सीला किंवा कंपनीला डेटा हवा असेल तर ट्विटर असा डेटा विकतं आणि त्यातून पैसे मिळवतं. हे ट्विटरचे साधे-सोपे बिझनेस मॉडेल आहे.
ट्विटर कॉन्ट्रोव्हर्सीमधूनही पैसा कमावतं!
कॉन्ट्रोव्हर्सी किंवा एखादा ट्रेण्ड हा सुद्धा ट्विटरसाठी पैसे कमावण्याचा मार्ग आहे. बऱ्याचवेळा आपण पाहतो की, ट्विटरवर काही गोष्टी ट्रेडिंग होत असतात. अर्थात हा ट्रेण्ड ट्विटर स्वत: युझर्सना सांगत असतं. कारण अशा ट्रेण्डस् आणि कॉन्ट्रोव्हर्सीमधूनही ट्विटर अॅड् प्रमोशन करून भरपूर पैसे कमावतं. त्यामुळे कदाचित इलॉन मस्कची ट्विटरवर कॉन्ट्रोव्हर्सी तयार करायची एखादी स्ट्रॅटेजी असू शकते. थोडक्यात काय, तर ट्विटर कॉन्ट्रोवर्सीमधूनही पैसा कमावतं!