Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Padma Shri Dr. Dawar: फक्त 20 रुपयात लोकांचा उपचार करतात डॉ. दावर; एकेकाळी लष्करातही बजावली होती सेवा

Dr. Dawar

Image Source : www.india.com

Padma Shri Dr. Dawar: डॉ. मुनीश्वर चंद्र डावर(Dr. Munishwar Chand Dawar) हे जबलपूरमध्ये अत्यंत नाममात्र शुल्कात लोकांवर उपचार करत आहेत. त्यांनी सुरुवातीला 2 रुपयांत लोकांवर उपचार सुरू केले आणि सध्या ते फक्त 20 रुपये फी घेऊन अगदी माफक दरात लोकांवर उपचार करत आहेत.

Padma Shri Dr. Dawar: ही गोष्ट आहे अथक परिश्रमाची आणि सामाजिक कार्याची. म्हणतात ना, तुम्ही कर्म करत जा फळाची अपेक्षा ठेवत जाऊ नका, देव तुम्हाला वेळ आल्यावर योग्य ते फळ नक्कीच देईल. हेच शब्द खरे ठरलेत डॉ. मुनीश्वर चंद्र डावर(Dr. Munishwar Chand Dawar) यांच्या बाबतीत. मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील 77 वर्षीय डॉ. मुनीश्वर चंद्र डावर(Dr. Munishwar Chand Dawar) यांना भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी(25 जानेवारी 2023) संध्याकाळी पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. डॉ. एम. सी. दावर यांनी 2 रुपयांपासून लोकांचे उपचार करायला सुरुवात केली होती. सध्या ते फक्त 20 रुपये तपासणी फी घेतात. चला तर आजच्या लेखात  डॉ. एम. सी. दावर यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

डॉ. दावर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती(About Dawar)

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील 77 वर्षीय डॉक्टर, डॉ. मुनीश्वर चंद्र डावर(Dr. Munishwar Chand Dawar) यांना भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.डॉ. दावर यांचा जन्म 16 जानेवारी 1946 रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर ते भारतात आले. 1967 मध्ये त्यांनी जबलपूर येथून एमबीबीएस(MBBS) (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) पूर्ण केले. 
1971 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यांनी जवळपास एक वर्ष भारतीय लष्करातही सेवा बजावली होती. त्यानंतर 1972 पासून ते जबलपूरमध्ये अत्यंत नाममात्र शुल्कात लोकांवर उपचार करत आहेत. त्यांनी सुरुवातीला  2 रुपयांत लोकांवर उपचार सुरू केले आणि सध्या ते फक्त 20 रुपये फी घेऊन अगदी माफक दरात लोकांवर उपचार करत आहेत.

पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. दावर यांचे मत(After receiving the award, Dr. Dawar's opinion)

पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. दावर यांनी एएनआयला(ANI) सांगितले की, बऱ्याच वेळा मेहनतीचे उशिरा का होईना फळ मिळते. त्या मेहनतीमुळे आणि लोकांच्या आशीर्वादामुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे. आपल्या जीवनातील अनुभवांविषयी बोलताना ते म्हणाले की, एवढी कमी फी घेण्याबाबत घरात चर्चा नक्कीच झाली होती, पण त्यावर कोणताही वाद झाला नाही. आमचा उद्देश फक्त लोकांची सेवा करणे हा होता. त्यामुळेच फी वाढवली नाही. संयमाने काम करत राहिले तर नक्कीच यश मिळते. त्यामुळे तुम्ही तुमचे काम करत राहा असे डॉ. डावर यांनी सांगितले. 
दावर यांचा मुलगा ऋषी म्हणाले की, "आम्हाला वाटायचे की पुरस्कार केवळ राजकीय पोहोच असलेल्या लोकांनाच दिले जातात, परंतु सरकार ज्या पद्धतीने लोकांना शोधून त्यांचा सन्मान करत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. वडिलांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. सून सुचिता यांना विचारले असता, आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या शहरासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.