Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Padma Bhushan Sudha Murthy: जेव्हा विमानतळावर सुधा मूर्तींना साध्या पेहरावामुळे अडवण्यात आलं होतं...

Sudha Murthy

Image Source : www.jagranjosh.com

Padma Bhushan Sudha Murthy: भारत सरकारने सुधा मूर्ती(Sudha Murthy) यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधा मूर्तींनी त्यांच्या आयुष्यात काही आर्थिक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ज्याचा फायदा त्यांना पुढे जाऊन झाला. आजच्या लेखात हे 4 रंजक किस्से सांगितले आहे, जे नक्की जाणून घ्या.

Padma Bhushan Sudha Murthy: इन्फोसिसचे(Infosys) संस्थापक एनआर नारायण मूर्ती(N.R. Narayan Murthy) यांच्या सुविद्य पत्नी सुधा मूर्ती(Sudha Murthy) यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यापैकी 91 जणांना पद्मश्री, 6 जणांना पद्मविभूषण आणि 9 जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मभूषण पुरस्कारांमध्ये सुधा मूर्ती यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे. सुधा मूर्ती यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. औद्योगिक जगातील  मोठं आणि आदरणीय नाव म्हणून त्यांची ख्याती आहे. साधी राहणी आणि उत्तम विचारसरणी असणाऱ्या सुधा मूर्तींच्या जीवनातील अनेक किस्से लोकप्रिय आहेत. ज्यातून अनेकांना खूप काही शिकता येईल. त्यापैकीच काही किस्से आज आपण जाणून घेणार आहोत.

मुलाला इतरांना मदत करण्यास शिकवले(Teach the child to help others)

सुधा मूर्ती यांनी एकदा एक किस्सा सांगितला होता. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीवर 50,000 रुपये खर्च करण्याऐवजी एक छोटीशी पार्टी करून उर्वरित पैसे ड्रायव्हरच्या मुलांच्या शिक्षणासाठी द्यावे, असे त्यांनी आपल्या मुलाला सांगितले. सुधा मूर्ती म्हणाल्या, 'प्रथम माझ्या मुलाने यासाठी नकार दिला. मात्र तीन दिवसानंतर त्याने होकार दिला. काही वर्षांनंतर माझ्या मुलाला शिष्यवृत्ती मिळाली होती, ती घेऊन तो माझ्याकडे आला आणि 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी हा पैसा वापरावा असे त्याने सांगितले. सुद्धा मूर्ती म्हणाल्या की, मुलांना पैसा, दया, प्रेम आणि आशा वाटून घेणे शिकवले पाहिजे. त्यामुळे ते सर्वांना समान वागणूक देतात.

साध्या राहणीमानासाठी ऐकावे लागले टोमणे(taunts for simple living conditions)

सुधा मूर्ती(Sudha Murthy) यांना साधे जीवन जगायला आवडते. नुकताच त्यांचे जावई ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहे. पण याच यूकेमध्ये(UK) कधीतरी सुधा मूर्तीना सलवार-कमीज परिधान केल्याबद्दल वर्णद्वेषी टिप्पण्या ऐकाव्या लागल्या होत्या. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर(London's Heathrow Airport) सुधा मूर्तींना तुम्ही 'कॅटल क्लास'मध्ये असल्यामुळे तुम्ही इकॉनॉमी क्लासमध्ये उभे राहा, असे सांगण्यात आले होते. ही घटना सुधा मूर्तींनी एका पॉडकास्ट दरम्यान सांगितली होती. सुधा मूर्ती म्हणाल्या होत्या, 'मी सलवार-कमीज घातला होता आणि मी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उभी होते. मग कोणीतरी म्हणाले की तुम्ही इकॉनॉमी क्लासमध्ये उभे राहा, कारण तुम्ही कॅटल क्लासचे आहात. त्यांना वाटलं मला इंग्रजी येत नाही . आजकाल लोक बाहेरील पोशाख आणि राहणीमानावरून एखाद्याबद्दल मत ठरवतात, जे अतिशय चुकीचे आहे.

पैसे बचतीचा मंत्र आईने दिला(Mother gave money saving mantra)

तुम्हाला माहित आहे का, इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती(Infosys founder NR Narayan Murthy) यांनी पत्नी सुधा मूर्ती(Sudha Murthy) यांच्याकडून 10,000 रुपयांची मागणी करून कंपनी सुरू केली होती. नारायण मूर्ती म्हणतात की त्यांची पत्नी ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक अडचणीत ती त्याच्या पाठीशी उभी राहिली आहे. एका मुलाखतीत सुधा मूर्तींना विचारले होते की, 10,000 रुपये देताना तुम्हाला काळजी वाटली नाही का? त्यावर त्या म्हणाल्या की, 'माझं लग्न झालं तेव्हा माझ्या आईने मला काही पैसे बचत करून ठेवायला सांगितले होते. ही साठवलेली रक्कम फक्त आपत्कालीन परिस्थितीतच वापर असा सल्लाही तिने दिला होता. हे पैसे साडी, सोने किंवा इतर काही खरेदीसाठी न वापरता फक्त आपत्कालीन परिस्थितीतच वापरावेत असेही तिने सांगितले होते. मी माझ्या पतीच्या  आणि माझ्या पगारातून दर महिन्याला काही पैसे बाजूला ठेवत होते. नारायण मूर्ती यांना याची माहितीही नव्हती. हे पैसे मी एका पेटीत ठेवत होते. ते साठत जाणून जवळपास 10,250 रुपये झाले होते, जे इन्फोसिस उभारण्यासाठी कामी आले.

मदतीसाठी कायम तत्पर(Always ready to help)

बंगळुरूला जाणाऱ्या ट्रेनमध्ये, टीसीला एक अकरा वर्षांची मुलगी सीटखाली लपून बसलेली दिसली. मुलगी रडत म्हणाली की तिच्याकडे तिकीट नाही. तिकीट चेकरने तिला खडसावले आणि गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. या प्रसंगावेळी ट्रेनमध्ये सुधा मूर्तीही(Sudha Murthy) हजर होत्या. त्या लगेच म्हणाल्या की या मुलीचे बंगलोरपर्यंतचे तिकीट काढा, मी पैसे देईन. तिकीट चेकर म्हणाला की, मॅडम तिकीट काढण्यापेक्षा दोन चार रुपये दिले तर बरे होईल. पण मूर्ती यांनी मुलीचेच तिकीट काढण्यास प्राधान्य दिले. जेव्हा त्यांनी मुलीला तू कुठे जात आहेस असे विचारले तेव्हा ती म्हणाली, 'मला माहित नाही, मॅडम.' त्या मुलीचे नाव चित्रा होते. सुधा मूर्ती यांनी तिला बंगळुरूला नेले आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात दिले. चित्रा तिथेच राहून अभ्यास करू लागली, मूर्तीही तिच्या तब्बेतीची अधूनमधून विचापूस करत असत. त्यानंतर तब्बल वीस वर्षांनी सुधा मूर्ती अमेरिकेत एका कार्यक्रमासाठी गेल्या. कार्यक्रमानंतर त्या बिल भरण्यासाठी रिसेप्शनवर गेल्या, तेव्हा त्यांना समोर बसलेल्या एका जोडप्याने बिल भरल्याचे समजले. सुधा मूर्ती जोडप्याकडे गेल्या आणि विचारले की, तुम्ही माझे बिल का भरले? त्यावर ती मुलगी म्हणाली, 'मॅडम, गुलबर्गा ते बंगळुरूच्या तिकिटाच्या तुलनेत हे काहीच नाही.' ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून चित्रा होती. सुद्धा मूर्ती यांच्या मदतीमुळे तिचे आयुष्यच बदलून गेले होते.