Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Layoff at OYO: ट्विटर, मेटा आणि आयटी कंपन्यांनंतर आता ओयो कंपनी 600 कर्मचाऱ्यांना कमी करणार!

Layoff at OYO

Layoff at OYO: जगभर सुरू असलेल्या नोकर कपातीचे वारे सोशल मिडिया आणि आयटी कंपन्यांनंतर आता OYO मध्ये सुद्धा शिरले. OYO कंपनी 600 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

ओयो (OYO) कंपनीने आपल्या कॉर्पोरेट आणि टेक्नॉलॉजी विभागातील 600 नोकऱ्यांची पदे रद्द करणार असून कंपनीतील एकूण 3700 कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचे शनिवारी (दि.3 डिसेंबर) जाहीर केले. यामुळे कंपनतील 600 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे.

ट्रॅव्हल टेक फर्म ओयो (Travel Tech firm OYO) कंपनीने रिलेशन मॅनेजमेंट टीममधील 250 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून 600 कर्मचाऱयांना नारळ देण्याची तयारी केली आहे. हा निर्णय जाहीर करताना ओयोने नमूद केले आहे की, हा कंपनीच्या अंतर्गत बदलांचा एक भाग आहे. त्याचाच भाग म्हणून कंपनीने प्रोडक्शन, इंजिनिअरिंग, कॉर्पोरेट ऑफिस आणि ओयो व्हेकेशन्स होम या संकल्पनेचा विस्तार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ओयो आता पार्टनरशीप रिलेशन मॅनेजमेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंटवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलेशनशीप मॅनेजमेंटद्वारे कंपनीला उभारी आणण्याचा प्रयत्न!

कस्टमर आणि व्यवसायातील पार्टनर यांच्यासोबत व्यवसाय वृद्धिगंत करण्यासाठी कंपनीने आपल्या मॅनेजमेंट टीमध्ये नवीन दमाच्या 250 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. यांच्या मदतीने कंपनीने हॉटेल्स आणि होम्सची संख्या वाढवून व्यवसाय वाढवण्याची योजना आखली आहे.

ओरावल ते ओयो रूम्स!

'ओरावल' या नावाने सुरू झालेल्या वेबसाइटलाच 2013 मध्ये OYO रूम्स असं नाव देण्यात आलं. रितेश अग्रवाल यांनी या कंपनीची सुरुवात केली होती. अगदी कमी काळात या स्टार्टअप कंपनीने मोठं यश मिळवले होते.


कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी सामावून घेण्याचा प्रयत्न करणार – रितेश अग्रवाल, सीईओ ओयो

कंपनीमधून ज्या कर्मचाऱ्यांना बाहेर जावे लागणार आहे. त्यांना इतर ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी कंपनीकडून सर्वप्रकारचे प्रयत्न केले जातील. तसेच त्यांचा मेडिकल इन्शुरन्स किमान 3 महिन्यांपर्यंत पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. ज्या कर्मचाऱ्यांची साथ आम्हाला सोडावी लागत आहे. ही आमच्यासाठी वाईट गोष्ट आहे. ज्यांनी कंपनीच्या भल्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. त्यांना भविष्यात कंपनीची प्रगती झाल्यावर प्राधान्य दिले जाईल, असे ओयोचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ रितेश अग्रवाल (Ritesh Agrawal, Founder & Group CEO of OYO) यांनी म्हटले.