Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Oppo A78 5G मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर भारतात होऊ शकतो लॉन्च

Oppo A78 5G

Image Source : www.oppohub.it

Oppo A78 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची असेल. फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल.

Oppo A78 5G मध्ये  ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची असेल. फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल.

Oppo ने भारतात आपला नवीन A सीरीज फोन लॉन्च करण्याची तयारी पूर्ण केली आहे. Oppo A78 5G मकर संक्रांतीच्या खास मुहूर्तावर 14 जानेवारीला लॉन्च होईल, अशी माहिती पुढे आली आहे.  Oppo ने या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. Oppo A78 5G ही Oppo A77 5G ची अपग्रेड केलेली एडिशन असेल जी गेल्या वर्षी जूनमध्ये थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आली होती.

Appuals च्या अहवालानुसार, Oppo A78 5G भारतात 14 जानेवारी 2023 रोजी लॉन्च होईल. फोनचा एक फोटोही लीक झाला आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, Oppo A78 5G सह डायमेंसिटी 700 प्रोसेसर उपलब्ध असेल. याशिवाय Oppo चा हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज सह लॉन्च केला जाईल.समोर आलेल्या Oppo A78 5G नुसार, यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची असेल. फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल.

या पुढे आलेल्या माहितीनुसार,  फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध असेल. फोनमध्ये Android 13 आधारित ColorOS 13.0 उपलब्ध असेल. Oppo A78 5G ची सुरुवातीची किंमत सुमारे 18,500 ते 19,000 रुपये असू शकते.Oppo ने गेल्या वर्षी थायलंड मध्ये Oppo A77 5G लाँच केला होता. पण, तो अजून भारतीय बाजारात सादर केलेले नाही. Oppo A77 5G मध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट  90Hz आहे.