Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ONGC Share Price: ओएनजीसीनं वाढवली 'पेट्रोनेट'मधली हिस्सेदारी, शेअर्समध्ये गुंतवणूक करून तुम्हीही होऊ शकता श्रीमंत!

ONGC Share Price: ओएनजीसीनं वाढवली 'पेट्रोनेट'मधली हिस्सेदारी, शेअर्समध्ये गुंतवणूक करून तुम्हीही होऊ शकता श्रीमंत!

ONGC Share Price: देशातल्या महारत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच ओएनजीसीनं पेट्रोनेटमधली आपली हिस्सेदारी वाढवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी निर्माण झाली आहे.

ओएनजीसीनं (Oil and Natural Gas Corporation) 17 जुलैला शेअर खरेदी कराराला अंतिम रूप दिलं आहे. ओएनजीसी पेट्रोनेटचे 19,960 इक्विटी शेअर्स खरेदी करणार आहे. पेट्रोनेट एमएचबी लिमिटेड (Petronet MHB Ltd) नावाच्या त्याच्या सहयोगी कंपनीचे हे शेअर्स खरेदी करून कंपनीतला आपला हिस्सा ओएनजीसी 49.996 टक्क्यांवरून 49.999 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे.

रोख मोबदल्यात भागभांडवल

या शेअर खरेदी करारामुळे, ओएनजीसी पेट्रोनेट एमएचबी लिमिटेडमधली आपलं स्थान आणखी मजबूत करणार आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशननं थेट पेट्रोनेट एमएचबी लिमिटेडमधला हा स्टेक विकत घेतला आहे. यात कोणतंही रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन नाही. हा भागभांडवल रोख मोबदल्यात खरेदी करण्यात आला आहे.

अधिग्रहण फायद्याचं

ओएनजीसीचं कामकाज वाढविण्याच्या दृष्टीनं हे अधिग्रहण अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. ओएनजीसी ही भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि वायू मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली पीएसयू कंपनी आहे. ओएनजीसीची स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. भारताच्या ऊर्जा क्षेत्रात ओएनजीसीची मोठी भूमिका आहे.

गुंतवणूकदारांना लाभांश

ओएनजीसीच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना 6.45 टक्क्यांचा चांगला लाभांश दिला आहे. बुधवारी शेअर बाजारात ओएनजीसीच्या शेअर्समध्ये थोडी नरमाई नोंदवली गेली आणि ते 166 रुपयांच्या पातळीवर ते काम करत होते.

शेअरची कामगिरी

मागच्या 3 वर्षांत ओएनजीसीच्या स्टॉकनं 107 टक्के इतका परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. गुरुवारी ओएनजीसीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली होती आणि ती 167 रुपयांच्या पातळीवर काम करत होती. 6 नोव्हेंबर 2020 रोजी ओएनजीसीच्या शेअर्समध्ये 68 रुपयांचा नीचांक होता. दरम्यान, गुंतवणूकदारांच्या भांडवलात 150 टक्के वाढ झाली.

पेट्रोनेटविषयी..

पेट्रोनेट एमएचबी लिमिटेड (PMHBL) या कंपनीची स्थापना 1998साली झाली. मंगळूरू इथल्या मंगळूर रिफायनरी ते हसन आणि देवगोंथी (बंगळुरू) इथल्या ऑइल मार्केटिंग कंपनी टर्मिनल्सपर्यंत पेट्रोलियम उत्पादन वाहतूक सुविधा देण्याच्या हेतूनं या कंपनीचा स्थापना समान वाहक तत्त्वावर करण्यात आली. 3,000 कोटी (420 दशलक्ष डॉलर अंदाजे) इतकं कंपनीचं अधिकृत भांडवल आहे.