स्मार्टफोनमधील प्रिमीयम ब्रँड असलेल्या वन प्लसने किबोर्डच्या निर्मितीमध्ये उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.वन प्लस फ्युचरिंग ही Keychron कंपनीची सहाय्याने किबोर्ड विकसित करणार आहे.स्मार्टफोन शिवाय कंपनीचे हे पहिलेच डिव्हाईस असेल. मॅकबुक, विंडोज आणि लायनक्स यांच्याशी वन प्लसचा कस्टमायझेबल किबोर्ड स्पर्धा करेल.
वन प्लसने या नव्या किबोर्डची झलक गुरुवारी ट्विटरवर दाखवली होती. याच्या अनोख्या डिझाईनमुळे टायपिंग करताना होणारा आवाज टाळता येईल,असा दावा कंपनीने केला आहे. अल्युमिनियममध्ये हा किबोर्ड तयार करण्यात आला असून तो वजनाने हलका आहे.
वन प्लस किबोर्ड हा मॅकबुक किबोर्डसारखाच आहे. हा किबोर्ड एमएस विंडोजला सपोर्ट करेल, असे कंपनीने म्हटलं आहे. नोव्हेंबर महिन्यात हा किबोर्ड कंपनीने विकसित केला होता. वन प्लस फ्युचरिंगकडून तयार करण्यात आलेले हे पहिलेच उत्पादन आहे. फेब्रुवारी 2023 पासून वन प्लस किबोर्ड बाजारात दाखल करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
भारतामध्ये वनप्लस हा झपाट्याने वाढणारा स्मार्टफोन ब्रॅंड ठरला आहे. वर्ष 2022 मध्ये पहिल्या तिमाहीत वन प्लसच्या विक्रीत 347% वाढ झाली होती. OnePlus Nord CE 2 5G आणि OnePlus 9RT हे दोन मॉडेल्सचा विक्रीमध्ये मोठा वाटा होता. स्मार्टफोनशिवाय कंपनीने स्मार्ट टीव्हीमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. वर्ष 2022 मधील पहिल्या सहामाहीत वन प्लस स्मार्ट टीव्हीच्या विक्रीत 123% वाढ झाली होती. वन प्लसचा स्मार्ट टीव्ही मार्केटमधील हिस्सा 13% इतका वाढला आहे. वन प्लसची Y1 हा स्मार्ट टीव्हीची यंदा सर्वाधिक विक्री झाली.