OnePlus फ्लॅगशिप फोन OnePlus 11 5G भारतात 7 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार आहे. आता OnePlus 11 सीरीजचा आणखी एक स्मार्टफोन OnePlus 11R लॉन्च झाल्याची बातमी येत आहे. मात्र, OnePlus 11R च्या डिझाइन आणि स्पेसिफिकेशनबद्दल माहिती लीक झाली आहे. असा दावा केला जात आहे की हा फोन स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. तसेच, फोनसोबत 5,000 mAh बॅटरी आणि 100 वॅट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टही उपलब्ध असणार आहे.
OnePlus 11R ची अंदाजित किंमत
OnePlus 11R ही OnePlus 10R ची अपग्रेडेड आवृत्ती म्हणून सादर केली जाणार आहे. हा फोन एप्रिल 2022 मध्ये 150W चार्जिंगसह लॉन्च झाला होता. हा फोन भारतात दोन एडिशनमध्ये सादर करण्यात आला होता. ज्यामध्ये एक एन्ड्युरन्स एडिशन 150W सुपर VOOC फास्ट चार्जिंगसह येतो तर दुसरा 80W सुपर VOOC फास्ट चार्जिंगसह येतो. फोनची स्टार्टिंग किंमत 38 हजार 999 रुपये ठरवण्यात आली होती. असा दावा केला जात आहे की, नवीन OnePlus 11R देखील त्याच किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.
OnePlus 11R ची अशी असतील फीचर्स?
जी माहिती पुढे आली आहे त्यानुसार, फोनची रचना Reno 9 Pro+ आणि OnePlus 11 वर आधारित आहे. म्हणजेच फोनसोबत IR ब्लास्टर आणि अलर्ट स्लायडर दिला जाऊ शकतो. फोनला 120Hz फुल एचडी प्लस 1.5k वक्र AMOLED PWM डिस्प्ले पॅनल मिळेल. त्याच वेळी, फोन Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर आणि LPDDR5 रॅमसह येईल. फोनला 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा मिळेल, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह येईल. फोनसोबत 5000 mAh बॅटरी आणि 100 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट असू शकतो.
OnePlus 11 5G
OnePlus 11 5G भारतात 7 फेब्रुवारी 2023 रोजी लॉन्च होईल. OnePlus 11 5G ही OnePlus 10 ची अपग्रेड केलेली एडिशन असणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली आहे. यानुसार, OnePlus 11 5G ला 6.7-इंच वक्र AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनला नवीनतम Android प्रोसेसर Snapdragon 8 Gen 2 आणि 16 GB पर्यंत RAM सह 512 GB पर्यंत स्टोरेज मिळेल. फोनसोबत 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध असेल. प्राथमिक कॅमेरा Sony IMX890 सेन्सरसह येईल. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आणि 100 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.